मुंबई, 14 ऑक्टोबर : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीवरून राजकीय धुरळा उडाला आहे. तर दुसरीकडे मिरा भाईंदर महापालिकेत भाजपने शिवसेनेला धक्का दिला आहे. मिरा भाईंदर पालिकेतील 4 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये शिवसेनेच्या 3 आणि काँग्रेसच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपमध्ये इन्कमिंग सुरूच आहे. अशातच आज मिरा भाईंदर महापालिकेमध्ये भाजपने शिवसेनेला धक्का दिला आहे. पालिकेतील चार नगरसेवकांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. या पैकी ३ हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील तर १ काँग्रेसचा नगरसेवक आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला हा धक्का मानला जात आहे. भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अवधूत तटकरे आणि इतर नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
आज शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे तीन आणि काँग्रेसचे एक यांनी प्रवेश केले आहे. अवधूत तटकरे हे सुद्धा उद्धव ठाकरे गटात होते त्यांनी पण आज उद्धव यांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली. (CM Eknath Shinde : ठाकरे गट झाला आता राष्ट्रवादी, जिल्हाप्रमुखच मुख्यमंत्री शिंदेंच्या गळाला, दिली मोठी जबाबदारी) ‘उद्धव ठाकरे यांच्या गटाला मिळालेले पक्षचिन्हामधील मशाल ही काँग्रेसच्या हातात आहे आणि त्या फोटोत मशाल घेतलेल्या हाताला राष्ट्रवादीचे घडी आहे. त्यामुळे आता ते आमच्याबरोबर नसल्याने जनता हे सहन करणार नाही, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला. ( 18 तासांचा ठिय्या, पोलीस स्टेशनसमोरच झोपले, अखेर खडसेंनी आंदोलन घेतले मागे! ) ‘अवधूत तटकरे यांच्या येण्याने उद्धव ठाकरेंना मोठा झटका आहे. असे झटके त्यांना येत्या काळात मिळत राहील. प्रत्येक निवडणुक वेगवेगळी असते. या निवडणुकांचे त्या निवडणुकीचा तसा संबंध नसतो. प्रत्येक निवडणूक वेगळी असते. अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. आम्ही ५१ टक्के मत घेवून जिंकून येतील असा विश्वास आहे. आम्ही ५१ टक्के मतांनी जिंकून येवू, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. कोणाला किती सुरक्षा दियायचे हे समिती ठरवते मंत्री ठरवत नसतात. आम्ही विरोधकांची सुरक्षा कमी केलेली नाही. समिती ज्या सुचना करतात त्यानुसार सुरक्षा देतात. आदित्य ठाकरेंची सुरक्षा कमी केली नाही. अशी सुरक्षा आधीच्या सरकारमध्ये पण मिळत होती, असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.