जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 18 तासांचा ठिय्या, पोलीस स्टेशनसमोरच झोपले, अखेर खडसेंनी आंदोलन घेतले मागे!

18 तासांचा ठिय्या, पोलीस स्टेशनसमोरच झोपले, अखेर खडसेंनी आंदोलन घेतले मागे!

18 तासांचा ठिय्या, पोलीस स्टेशनसमोरच झोपले, अखेर खडसेंनी आंदोलन घेतले मागे!

आज सकाळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाऊन खडसेंची भेट घेतली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षकांसोबत

  • -MIN READ Jalgaon,Jalgaon,Maharashtra
  • Last Updated :

नितीन नांदूरकर, प्रतिनिधी जळगाव, 14 ऑक्टोबर : जिल्हा दूध संघात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी गेल्या 18 तासांपासून राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी ठिय्या आंदोलन पुकारले होते. अखेरीस खडसेंनी ठिया आंदोलन स्थगित दिली आहे. या प्रकरणी आता खडसे न्यायालयात दाद मागणार आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी जिल्हा दूध संघात झालेल्या गैरव्यवहाराबाबत दूध संघात झालेला गैरव्यवहार हा गैरव्यवहार नसून तब्बल दीड कोटी रुपयांची चोरी झाली असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केली. यासाठी तब्बल 16 तास खडसेंनी पोलीस स्टेशनसमोर ठिय्या मांडला. (कोर्टाच्या दणक्यानंतर मुंबई पालिका वठणीवर, अखेर ऋतुजा लटकेंचा राजीनामा स्वीकारला) आज सकाळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाऊन खडसेंची भेट घेतली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षकांसोबत खडसे यांच्यासोबत चर्चा केली. बंदद्वार चर्चेनंतर एकनाथ खडसेंनी ठिय्या आंदोलन मागे घेत असल्याचे स्पष्ट केलं. ( अमित ठाकरेंना पाहण्यास आले अन् मोबाईल गायब झाले, कार्यकर्त्याचे पैसेही लांबवले ) दूध संघातील कोट्यावधींच्या चोरी प्रकरणी मात्र गुन्हा दाखल नाही. याप्रकरणी न्यायालयात दाद मागणार असून न्यायालयाकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल, असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं. पोलीस स्टेशनसमोरच झोपले खडसे! दरम्यान, खडसेंनी रात्रभर शहर पोलीस स्थानकाच्या बाहेरच मुक्काम ठोकला होता. रात्र आपल्या कार्यकर्त्यांसह खडसे हे पोलीस स्टेशनसमोरच झोपले होते. रात्री 12 च्या सुमारास पोलिसांनी एकनाथ खडसे यांचे निवेदन स्वीकारले होते. मात्र अद्यापपर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षकांच्या दालनातच पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत पोलीस प्रशासनाचा विरोध केला. सकाळी सुद्धा पोलीस अधिक्षकांनी येऊन खडसेंची भेट घेतली. त्यानंतर जयंत पाटील आणि खडसे यांच्यासोबत चर्चेनंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात