31 मे : राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पाठराखण केली आहे. या घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. सध्या तरी अजित पवारांना राजीनामा देण्याची गरज नाही.
प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडावं लागेल. त्यानंतरच निष्कर्ष काढता येईल असं पाटील स्पष्ट केलं. राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी सहकार आयुक्तालयाने अजित पवार यांच्यासह विजयसिंह मोहिते पाटील आणि बँकेचे तत्कालीन अध्यक्ष माणिकराव पाटील यांच्यावर ठपका ठेवला.
राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याची सहकार कायदा कलम 83 अन्वये चौकशी करण्यात आली. त्याचा अहवाल अलिकडेच सहकार आयुक्तालयाला सादर करण्यात आला. या प्रकरणी भाजप नेते विनोद तावडे यांनी काल अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
या प्रकरणात कुणा-कुणाची चौकशी होणार ?
बँकेचे तत्कालीन अध्यक्ष माणिकराव पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब सरनाईक, अजित पवार, विजयसिंह मोहिते पाटील ,यशवंतराव गडाख नितीन पाटील ,अमरसिंह पंडित, राजवर्धन कदमविजय वडेट्टीवार, ईश्रवचंद जैन, दिलीप देशमुख, जे एन पाटील रामप्रसाद बोर्डीकर, माणिकराव कोकाटे, सुरेश देशमुख, पांडुरंग फुंडकर, विलास जगताप, रजनी पाटील, आनंद आडसुळ, दिलीप सोपल या सगळ्यांची चौकशी होणार आहे. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++