जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / लोकांना 'होम' द्या, होम हवन कसलं करताय - उद्धव ठाकरे

लोकांना 'होम' द्या, होम हवन कसलं करताय - उद्धव ठाकरे

लोकांना 'होम' द्या, होम हवन कसलं करताय - उद्धव ठाकरे

27 ऑक्टोबर : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत केंद्रासह राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजपमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. लोकांना ‘होम’ द्या, होम हवनं कसले करत बसलात, असं टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजप सरकारवर लागवाला आहे. आम्हाला जिंकण्यासाठी तांत्रिक-मांत्रिकाची गरज नाही, शिवसैनिकांचा आशीर्वाद पुरेसा असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं. कल्याण-डोंबिवलीमधील निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर चांगलंच तोंडसुख घेतलं. जाहिरात बिहारमधल्या एका सभेदरम्यान बोलताना मोदींनी नितिश कुमार आणि लालूप्रसाद यादव हे तंत्रमंत्रांचा वापर असल्याचा आरोप करत आरजेडी म्हणजे ‘राष्ट्रीय जादूटोणा दल’, असं म्हटलं होतं.

  • -MIN READ
  • Last Updated :
    uddhav thackarey tuljapur

    27 ऑक्टोबर : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत केंद्रासह राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजपमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. लोकांना ‘होम’ द्या, होम हवनं कसले करत बसलात, असं टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजप सरकारवर लागवाला आहे. आम्हाला जिंकण्यासाठी तांत्रिक-मांत्रिकाची गरज नाही, शिवसैनिकांचा आशीर्वाद पुरेसा असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं. कल्याण-डोंबिवलीमधील निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर चांगलंच तोंडसुख घेतलं.

    जाहिरात

    बिहारमधल्या एका सभेदरम्यान बोलताना मोदींनी नितिश कुमार आणि लालूप्रसाद यादव हे तंत्रमंत्रांचा वापर असल्याचा आरोप करत आरजेडी म्हणजे ‘राष्ट्रीय जादूटोणा दल’, असं म्हटलं होतं. त्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला भरघोस यश मिळावं म्हणून होमहवन करत आहे. आता या पक्षाला काय नाव ठेवावं असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

    प्रचारावेळी साबरमती, साबरमती करणारे निवडून दिल्यानंतर मात्र, बारामती…बारामती करतात, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि पवारांवर जोरदार टीकास्त्र सोडलं. तर देशामध्ये कुणातरी 100 बारामती हव्या आहेत. तुम्ही तुमची बारामती होऊ देवू नका, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. तसंच शिवसेना ही भूमिपुत्रांच्या हक्कासाठी लढणारी सेना आहे, बिल्डरांची सेना नाही असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

    जाहिरात

    कल्याण-डोंबिवलीत आम्ही कामं करून मते मागत आहोत, असा दावाही उद्धव यांनी यावेळी केला. ज्यांना कामं दिसत नाहीत, त्यांना मोतीबिंदू झाला असेल अशी टीका उध्दव ठाकरेंनी केली. कल्याण-डोंबिवलची स्मार्ट सिटी करण्याची घोषणा करणार्‍यांनी सर्वप्रथम काय करणार हे सांगावे. शिवसेना सध्या जे काही करतेय त्यापेक्षा तुम्ही वेगळे असे काय करणार, असा सवाल उद्धव यांनी भाजपला विचारला.

    जाहिरात

    दरम्यान, आपापसांत लढण्याची ही वेळ नाही, भगव्यासाठी पाठीमागे या असं आवाहन उध्दव ठाकरेंनी यावेळी शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांना केलं.

    ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

    Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात