19 ऑक्टोबर : ‘सत्ता स्थापनेत राष्ट्रवादी महत्वाची भूमिका बजावले’ असं सुचक विधान करून राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी खळबळ उडवून दिली होती. अखेरीस आपलं विधान खरं ठरवत आता राष्ट्रवादीने भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आमची कुठलीही अट नाही फक्त राज्याला स्थिर सरकार पाहिजे यासाठी आम्ही पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला अशी घोषणा पटेल यांनी दिल्लीत केली. भाजपनेही यावर चर्चा करून निर्णय घेऊन असं सांगत शिवसेनेला वेटिंगवर ठेवलंय.
विधानसभेचा निकाल जाहीर झाला आणि भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजप आणि घटकपक्षांना सर्वाधिक 121 जागा मिळाल्यात. एकट्या भाजपला मात्र बहुमताचा आकडा भाजपला गाठता आला नाही. त्यामुळे अगोदर शिवसेनेनं पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. पण ‘पहले आप पहले आप’ न करता राष्ट्रवादीने थेट बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणाच करून टाकली. स्वबळावर सरकार बनवता येत नाही. मग शिवसेना असो किंवा भाजप असो कुणीही महाराष्ट्राला स्थिर सरकार देऊ शकत नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे असं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं. तसंच प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण होऊ शकत नाही असंही पटेल म्हणाले. यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी लगेच आपली प्रतिक्रिया दिली. आमच्या समोर सर्व पर्याय खुले आहे. आज संध्याकाळी आमची बैठक होणार असून त्यानंतर निर्णय घेऊ असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. विशेष म्हणजे प्रचाराच्या रणधुमाळी भाजप आणि राष्ट्रवादीची हातमिळवणी आहे अशी चर्चा बरीच रंगली होती. खुद्ध शरद पवार यांनीच भाजपसोबत जाणार नाही असं जाहीर केलं होतं. तर भाजपच्या नेत्यांनीही राष्ट्रवादीची साथ घेणार नसल्याचं सांगितलं होतं. आता मात्र सर्व निर्णय भाजपवर अवलंबून आहे त्यामुळे भाजप काय निर्णय घेते हे पाहण्याचं ठरेल. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++