जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / ..तर बारामतीत पवारांविरोधात लढणार-पांढरे

..तर बारामतीत पवारांविरोधात लढणार-पांढरे

..तर बारामतीत पवारांविरोधात लढणार-पांढरे

14 फेब्रुवारी : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार हे जर बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असतील तर आपण त्यांच्या विरोधात लढू अशी भूमिका आपचे नेते विजय पांढरे यांनी घेतली आहे. महाराष्ट्रात शासकीय योजनांमध्ये भ्रष्टाचार करण्यात राष्ट्रवादी आघाडीवर असून भाजप-शिवसेनेनंही सत्ता असताना कृष्णा खोरे घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला. तर राजू शेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल करून शासनाने योग्य निर्णय घेतला आहे. शेट्टी यांच्या आंदोलनामुळेच एका पोलीस अधिकार्‍याला जीव गमवावा लागल्याची टीका शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांनी केली.

  • -MIN READ
  • Last Updated :

    Image img_217642_vijaypandhareonncp_240x180.jpg 14 फेब्रुवारी : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार हे जर बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असतील तर आपण त्यांच्या विरोधात लढू अशी भूमिका आपचे नेते विजय पांढरे यांनी घेतली आहे.

    महाराष्ट्रात शासकीय योजनांमध्ये भ्रष्टाचार करण्यात राष्ट्रवादी आघाडीवर असून भाजप-शिवसेनेनंही सत्ता असताना कृष्णा खोरे घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला. तर राजू शेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल करून शासनाने योग्य निर्णय घेतला आहे. शेट्टी यांच्या आंदोलनामुळेच एका पोलीस अधिकार्‍याला जीव गमवावा लागल्याची टीका शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांनी केली.

    जाहिरात

    आप पक्षाच्या वतीने मुंबईतून मेधा पाटकर या लोकसभेची निवडणूक लढवतील अशी शक्यता विजय पांढरे यावेळी वर्तवली. तसंच येत्या दोन दिवसात महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची पहिली यादी दिल्लीमध्ये जाहीर केली जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात