31 जानेवारी : राष्ट्रवादीचे नेते भाजपच्या संपर्कात आसल्याची माहिती आयबीएन लोकमतला मिळाली आहे. त्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण करून काँग्रेसवर दबाव आणत असल्याचे म्हटलं जातं आहे. अशातच राष्ट्रीय प्रवक्ते डी. पी. त्रिपाठी यांनी राष्ट्रवादीसाठी सर्व पर्याय खुले आहेत, असं म्हणून पुन्हा एकदा संभ्रम निर्माण केला आहे.
जागावाटपाबाबत काँग्रेस निर्णय घ्यायला उशीर करतंय हे खेदजनक आहे. पण आमच्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत असं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते आणि केंद्रातले नेते वेगवेगळी भाषा बोलत आहेत. आम्हाला काँग्रेसशी युती हवीय, पण काँग्रेसने लवकरात लवकर जागावाटपाबाबत निर्णय घ्यावा असं ही पटेल म्हणाले.
पवार-मोदी भेटीचा नकार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गुजरातचे पंतप्रधान उमेदवार नरेंद्र मोदी यांची भेट झाल्याच्या बातमी एका वृत्तपत्रानं दिली आहे. पण आपली गेल्या एका वर्षापासून नरेंद्र मोदींशी भेट झालेली नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. ही बातमी, पूर्णपणे खोडसाळ आधारहिन आणि चुकीची असल्याची प्रतिक्रिया शदर पवार यांनी ट्विटरवरून दिली आहे.
शरद पवारांचं ट्विट “एका वृत्तपत्रात आलेली मी नरेंद्र मोदी यांना 17 जानेवारीला नवी दिल्लीत भेटलो, ही बातमी, पूर्णपणे खोडसाळ आधारहिन आणि चुकीची आहे. राज्यांच्या भेटीदरम्यान किंवा दिल्लीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या परिषदेदरम्यान, मी मुख्यमंत्र्यांना भेटत असतो आणि हे प्रसंग सोडले तर मी गेल्या एक वर्षभरात मोदींना कधीही भेटलेलो नाही."