30 मे : लोकसभा निवडणुकीत दारूण अपयश आल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेससमोर राज्यात नवं संकट उभं ठाकलं आहे. राज्यात गाजलेल्या राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी सहकार आयुक्तालयानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विजयसिंह मोहिते पाटील आणि बँकेचे तत्कालीन अध्यक्ष माणिकराव पाटील यांच्यावर ठपका ठेवला आहे.
राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याची सहकार कायदा कलम 83 अन्वये चौकशी करण्यात आली. त्याचा अहवाल अलिकेडच सहकार आयुक्तालयाला सादर करण्यात आला आहे. चौकशी अधिकार्यांनी घोटाळ्याप्रकरणी ज्या संचालक मंडळावर ठपका ठेवला आहे, त्यात अजित पवार, विजयसिंह मोहिते पाटील, माणिकराव पाटील, यांचा समावेश आहे. त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यासाठी पुढची चौकशी सुरू आहे.
कलम 88 अन्वये जबाबदारी निश्चितीची चौकशी सध्या सुरू आहे. याचा अहवाल तीन महिन्यांत सादर करायचा आहे. 2010 मध्ये या बँकेचे संचालक मंडळ रिर्झव्ह बँकेने बरखास्त केलं होतं. सहकार आयुक्तालय ज्या सहकार खात्याच्या अंतर्गत येतं, ते सहकार खातं काँग्रेसच्या ताब्यात आहे, त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या आधी अजित पवार आणि पर्यायाने राष्ट्रवादीला घेरण्याचे काँग्रेसचे प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे नेते विनोद तावडे यांनी केली आहे. तर पवारांवरती फौजदारी कारवाई व्हायला हवी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++