06 मार्च : अखेर लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आणि आता या महासंग्राम कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष्य लागले आहे. देशभरात भाजप विरुद्ध काँग्रेस असा मुकाबला रंगणार हे स्पष्ट आहे. भाजपने तर यंदा सत्ता आमचीच असा दावाही केलाय. पण पक्षांनी कितीही दावे केले तरी मतदारराजा कुणाला आपला कौल देतो हे सर्वात महत्त्वाचे आहे. म्हणूनच मतदारराजाचा कौल घेण्यासाठी आयबीएन नेटवर्क आणि लोकनिती सीएसडीसीने सर्व्हे केलाय. या सर्व्हेनुसार लोकसभेच्या महासंग्रामात आता 'काटे की टक्कर' पाहण्यास मिळणार आहे.
543 जागांपैकी एनडीए 212 ते 232 जागा पटकावेल. तर यूपीए सरकारला 119 ते 139 जागांवर समाधान मानावे लागेल. जानेवारीमध्ये सर्व्हे घेण्यात आला तेव्हा एनडीएला 211 ते 231 जागा मिळतील असा अंदाज होता तो फेब्रुवारीमध्ये 212 ते 232 जागांवर पोहचला आहे. तर यूपीएची परिस्थिती सुधारल्याचं चित्र असून जानेवारीमध्ये 192 ते 210 जागांवरून फेब्रुवारीमध्ये 193 ते 213 जागांवर मुसंडी मारलीय.
पक्षानिहाय पाहिलं तर भाजपला 119 ते 139 जागा मिळतील आणि काँग्रेसला 94 ते 110 जागा मिळतील. पण बहुमतासाठीचा 272 बहुमताचा आकाडा गाठण्यासाठी इतर पक्षांना सोबत घ्यावेच लागणार आहे. इतर पक्षांमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला 20 ते 28 जागा मिळतील त्यामुळे बहुमतासाठी पहिलं साकडं हे ममतादीदींकडे घालावं लागणार आहे. त्यानंतर डावे 15 ते 23 जागा आणि अण्णा द्रमुक 14 ते 20 जागा,वायएसआर काँग्रेस 11 ते 17 जागा आणि समाजवादी पार्टी 11 ते 17 जागा पटकावतील. त्यामुळे सत्तेची खुर्ची मिळवण्यासाठी एनडीएला इतर पक्षांचा 'टेकू' घ्यावाच लागणार आहे.
मग यानंतर साहजिकच प्रश्न येतो पंतप्रधान कोण होणार ? तर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनाच जनतेनं अधिक पसंती दिलीय. 42 टक्के लोकांना मोदी पतंप्रधान व्हावे असं वाटतंय. तर 22 टक्के लोकांना राहुल गांधी पंतप्रधान व्हावे असं वाटतंय. जानेवारीमध्ये सर्व्हे घेण्यात आला होता तेव्हा मोदींना 45 टक्के लोकांनी पसंती दिली ती फेब्रुवारीमध्ये 3 टक्कांनी घटलीय. तर राहुल गांधींच्याबाबत जानेवारीमध्ये 21 टक्के पसंती होती ती फेब्रुवारीमध्ये 22 टक्के झालीय. तर दुसरीकडे यूपीए -2 सरकारच्या कामावर 45 टक्के ग्रामीण जनता समाधानी आहे आणि 46 टक्के शहरी जनता समाधानी आहे. पण तरीही यूपीए सरकारला जनतेनं आता नको असंच म्हटलंय. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कामगिरीवर फक्त 11 टक्के जनता समाधानी आहे तर 33 टक्के जनता काही प्रमाणात समाधानी आहे.
==================================================================
जागांचा अंदाज - एकूण जागा - 543 ==================================================================
================================================================== राहुल गांधींना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित न करण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं ? ==================================================================
==================================================================
यूपीए-2 सरकारच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का ? जाने.14 फेब्रु.14 समाधानी - 6% 11% काही प्रमाणात समाधानी - 26% 34% असमाधानी - 14% 15% काही प्रमाणात असमाधानी - 39% 31% माहीत नाही - 15% 9% ================================================================== यूपीए-2 सरकारच्या समाधानकारक कामगिरीवर ग्रामीण आणि शहरी भागाचं मत? जाने.14 फेब्रु.14 ग्रामीण - 33% 45% शहरी - 29% 46% ================================================================== पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची कामगिरी समाधानकारक आहे का ? जाने.14 फेब्रु.14 समाधानकारक - 7% 11% काही प्रमाणात समाधानकारक - 30% 33% असमाधानकारक - 13% 13% काही प्रमाणात असमाधानकारक - 34% 30% माहीत नाही - 16% 12% ================================================================== यूपीए सरकारला पुन्हा संधी द्यावी का ? जाने.14 फेब्रु.14 आंध्रप्रदेश 12% 12% बिहार 21% 21% दिल्ली 16% 25% महाराष्ट्र 25% 25% तामिळनाडू 19% 25% उत्तर प्रदेश 20% 24% सहा राज्यात 20% 23% ================================================================== मतांची तुलनात्मक टक्केवारी ================================================================== पक्ष 2009 फेब्रु.14 काँग्रेस 28.6% 26% यूपीए 4.4% 3% भाजप 18.8% 33% एनडीए 3% 3% बसप 6.2% 4% डावे 7.6% 3% सपा 3.4% 4% AAP - -- 3% इतर 28% 4% ================================================================== जागांचा तुलनात्मक अंदाज - एकूण जागा - 543 ================================================================== पक्ष 2009 जाने.14 फेब्रु.14 -------------------------------------------------------------------------------------------------------- एनडीए 131 211-231 212-232 भाजप 116 192-210 193-213 यूपीए 228 107-127 119-139 काँग्रेस 206 92-108 94-110 तृणमूल काँग्रेस 19 20-28 20-28 अण्णा द्रमुक 9 15-23 14-20 डावे 24 15-23 15-23 YSR काँग्रेस 0 11-19 11-17 बिजू जनता दल 14 10-16 10-16 बसप 21 10-16 8-4 तेलुगु देसम पार्टी 6 9-15 10-16 सपा 23 8-4 11-17 जेडीयू 20 7-13 1-5 द्रमुक 18 7-13 10-16 AAP 0 6-12 1-5 राजद 4 6-10 ---- टीआरएस 2 4-8 4-8 जेडीएस 3 4-8 4-8 ==================================================================मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: AAP, BJP, Congress, Election, Election 2014, Narendra modi, NDA, Rahul gandhi, Sharad pawar, Sonia gandhi, Sonia Gandhi (Author), Soniya gandhi, UPA, काँग्रेस, नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, राहुल गांधी, लोकसभा