मुंबई, 04 जून : झोमॅटो ही आॅनलाइन फूड डिलिव्हरीची मोठी कंपनी. नुकतीच या कंपनीनं एक मोठी घोषणा केलीय. यात त्यांनी पुरुष कर्मचाऱ्यांना 26 आठवड्यांची पॅटर्निटी रजा द्यायची घोषणा केलीय. सरकारी नियमांप्रमाणे महिलांना बाळंतपणासाठी 26 आठवड्यांची रजा दिलीय. एवढीच रजा पुरुषांना देणारी झोमॅटो ही भारतातली पहिली मोठी कंपनी आहे. झोमॅटोशिवाय फर्निचरची एक दिग्गज आंतरराष्ट्रीय कंपनी आयकिया आपल्या कर्मचाऱ्यांना सहा महिने पॅटर्निटी रजा देते. भारतातल्या बऱ्याच कंपन्या पुरुषांना पॅटर्निटी रजा दोन आठवडेच देतात. शिवाय आई-वडील बनणाऱ्या आपल्या कामगारांना 69 हजार रुपये देते. MHT-CET निकाल जाहीर; इथे पाहा निकाल ‘या’ कारणामुळे भारतातल्या अनेक नोकऱ्यांवर टांगती तलवार झोमॅटोच्या संस्थापकांनी लिहिलं पत्र झोमॅटोचे संस्थापक आणि सीईओ दीपेंद्र गोएल यांनी सोमवारी ब्लाॅग लिहून ही माहिती दिली. झोमॅटो संस्थापकांनी लिहिलंय, महिला आणि पुरुषांसाठी नव्या बाळाचं स्वागत करायला दिलेल्या सुट्ट्यांमध्ये असंतुलन आहे. भरधाव कारनं चिरडल्यानं पादचाऱ्याचा मृत्यू,मुंबईतील महालक्ष्मीजवळील दुर्घटना त्यांनी सांगितलं की आम्ही स्त्री कर्मचाऱ्यांना सरकारी नियमांप्रमाणे 26 आठवडे रजा देतोच आहोत. पण आता ही सुविधा पुरुष कर्मचाऱ्यांनाही देतोय. पुढे ते म्हणालेत, ही योजना सरोगसी, मूल दत्तक घेणं किंवा समलिंगी पालकांसाठीही आहे. धोकादायक पुलांमुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडी? पाहा रिअॅलिटी चेक
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







