जाहिरात
मराठी बातम्या / देश / MHT-CET निकाल जाहीर; इथे पाहा निकाल

MHT-CET निकाल जाहीर; इथे पाहा निकाल

MHT-CET निकाल जाहीर; इथे पाहा निकाल

MHT-CET परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. https://mhtcet2019.mahaonline.gov.in या वेबसाईटला निकाल पाहता येणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 04 जून : MHT-CET परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेमध्ये मुंबईच्या किमया शिकारखाने आणि अमरावतीच्या सिद्धेश अग्रवालनं अव्वल येण्याचा मान पटकावला आहे. किमया आणि सिद्धेशनं 99.98 टक्के गुण मिळवले आहेत. मध्यरात्रीपासून निकाल वेबसाईटवर उपलब्ध आहे. https://mhtcet2019.mahaonline.gov.in या वेबसाईटला भेट दिल्यानंतर हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. राज्यात MHT-CETच्या परीक्षेसाठी राज्यातून 4 लाख 13 हजार 284 विद्यार्थ्यांनी अर्ज भरला होता. त्यापैकी 3 लाख 92 हजार 354 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर, 20 हजार 930 विद्यार्थी हे अनुपस्थित राहिले. सीईटीचा निकाल हा 3 जून किंवा त्यापूर्वी जाहीर होईल असं सांगण्यात आलं होतं. पण, त्यानंतर 4 जून रोजी निकाल जाहीर करण्यात आला. MHT-CETची परीक्षा ही 2 मे 2019 आणि 13 मे 2019 रोजी घेण्यात आली होती. SPECIAL REPORT: हिंदी भाषेच्या सक्तीवरून सरकारचा यूटर्न?

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: result
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात