भरधाव कारनं चिरडल्यानं पादचाऱ्याचा मृत्यू,मुंबईतील महालक्ष्मीजवळील दुर्घटना

दोन भरधाव कारच्या अपघातात एका पादचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 4, 2019 07:54 AM IST

भरधाव कारनं चिरडल्यानं पादचाऱ्याचा मृत्यू,मुंबईतील महालक्ष्मीजवळील दुर्घटना

मुंबई, 4 जून : दोन भरधाव कारच्या अपघातात एका पादचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील महालक्ष्मी परिसरात सोमवारी (3 जून) रात्री ही दुर्घटना घडली. मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यू कारचा अपघात झाला. चालकाचं कारवरील ताबा सुटल्यानं मर्सिडीज कार (E350) दुसऱ्या लेनमधून येणाऱ्या BMWवर जोरदार धडकली. या अपघातात दोन्ही वाहनांचं प्रचंड नुकसान झालं आहे. महालक्ष्मी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या के.के. मार्गावरील हा अपघात आहे. याप्रकरणी कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेस कोर्सच्या गेट क्रमांक 1 जवळील ही दुर्घटना घडली. दुसऱ्या पादचाऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात मर्सिडीज कार चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि कार थेट फूटपाथवरच शिरली. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. राजेंद्र प्रसाद राम असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात राजेंद्र गंभीर जखमी जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

(पाहा :VIDEO: धक्कादायक! कुलगाम परिसरात जवानांच्या गाडीर तुफान दगडफेक)

या अपघातग्रस्त मर्सिडीज कारची नोंदणी एका मोठ्या बिल्डरच्या नावावर असल्याचं म्हटलं जात आहे. या प्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत.(पाहा:SPECIAL REPORT : शिवरायांबद्दल वादग्रस्त टि्वट करण्याचा पायलचा हेतू काय?)

SPECIAL REPORT : मोदी सरकारचं पुन्हा एकदा 'मंदिर वही बनायेंगे'!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 4, 2019 07:50 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...