मुंबई, 03 जून : अमेरिका आणि चीनमधलं ट्रेड वाॅर तर वाढतंच आहे. वाॅल स्ट्रीटवरच्या सर्वात मोठ्या बँकांनी गुंतवणूकदारांना वाढत्या मंदीबद्दल सावध केलंय. इन्व्हेस्टमेंट बँक आणि फायनॅन्शियल सर्विसेज कंपनी माॅर्गन स्टेनली ( Morgan Stanley )नं एक पत्रक प्रसिद्ध केलं. त्यात असं म्हटलंय की अमेरिका आणि चीनमधलं ट्रेड वाॅर सुरूच राहिलं तर 9 महिन्याच्या आत जगभर मंदी सुरू होईल. 9 महिन्याच्या आत सुरू होईल मंदी ब्लूमबर्गमध्ये आलेल्या माहितीनुसार माॅर्गन स्टेनलीचे मुख्य इकाॅनाॅमिक्स आणि ग्लोबल हेड आॅफ इकाॅनाॅमिक्स चेतन अह्या यांनी सांगितलं की अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प 300 बिलियन डाॅलरशिवाय चिनी निर्यात 25 टक्के दरपत्रक लावलं आणि त्याला उत्तर म्हणून चीननं काही पावलं उचलली तर 9 महिन्याच्या आत मंदी सुरू होऊ शकते. जेपी माॅर्गन चेज अँड कंपनीनं सांगितलं की या वर्षी दुसऱ्या सहा महिन्यांत अमेरिकेत मंदीची शक्यता 25 टक्क्यांहून 40 टक्के झालीय. पुणे जिल्हा परिषदेत नोकरीची संधी, ‘या’ पदांसाठी 33 जागांवर भरती सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, तूरडाळ झाली 100 रुपये किलो अह्यानं आपल्या बातमीत लिहिलंय की गुंतवणूकदारांशी बोलून एक गोष्ट लक्षात आली की या ट्रेड वाॅरचा परिणाम बाजारावर अजून पडलेला नाही. गुंतवणूकदारांचं म्हणणं आहे की ट्रेड वाॅर खूप वेळ चालू शकतं, पण जागतिक परिणाम होईल असं दिसत नाही. ‘चाय पे चर्चा’, आता PM मोदींसोबत मिळणार चहा पिण्याची संधी ट्रम्पनं गेल्या महिन्यात 200 बिलियन डाॅलर्सच्या निर्यात होणाऱ्या चिनी उत्पादनांवर दरपत्रक 10 टक्क्यांहून वाढून 25 टक्के केलं होतं. याशिवाय अमेरिकेनं 300 बिलियन डाॅलर्सच्या इतर चिनी उत्पादनांच्या निर्यातीवरही दरपत्रक लावायची धमकी दिलीय. VIDEO : ‘मुंडेंसाहेबांनी तेव्हा फक्त स्लीपरचा पट्टा विकत घेतला होता’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







