Microsoft चे CEO सत्या नडेला यांच्या मुलाचं वयाच्या 26 व्या वर्षी निधन
Microsoft चे CEO सत्या नडेला यांच्या मुलाचं वयाच्या 26 व्या वर्षी निधन
CEO Satya Nadella
मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नडेला (Son of CEO Satya Nadella) आणि त्यांची पत्नी अनू यांचा मुलगा जैन नडेला (Zain Nadella Dies at 26) याचं सोमवारी सकाळी निधन झालं आहे.
नवी दिल्ली 01 मार्च : सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टने सांगितलं की कंपनीचे चीफ एग्झिक्यूटिव्ह ऑफिसर सत्या नडेला (Son of Microsoft CEO Satya Nadella) आणि त्यांची पत्नी अनू यांचा मुलगा झेन नडेला (Zain Nadella Dies at 26) याचं सोमवारी सकाळी निधन झालं आहे. झेन 26 वर्षांचा होता आणि त्याला जन्मापासूनच सेरेब्रल पाल्सी (Cerebral Palsy) आजार होता. सॉफ्टवेअर कंपनीने एका मेलच्या माध्यमातून कंपनीच्या स्टाफला याबद्दलची माहिती दिली.
मेलमध्ये स्टाफला नडेला यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना करण्याकरता सांगितलं गेलं. चिल्ड्रंस ह़ॉस्पिलटचे सीईओ जेफ स्पेरिंग यांनी आपल्या बोर्डला पाठवलेल्या मेसेजमध्ये लिहिलं, की झेनला असलेली संगिताची चांगली समज, त्याच्या चेहऱ्यावर हसू आणि आपल्या कुटुंबाला आणि जवळच्या लोकांना त्याने दिलेल्या आनंदासाठी तो नेहमीच आठवणीत राहील.
युक्रेनमधून 182 विद्यार्थी मुंबईत दाखल, भारतात पाऊल ठेवताच अश्रू अनावरकाय आहे सेरेब्रल पाल्सी आजार-
सेरेब्रल पाल्सी हा मेंदू आणि स्नायूंशी संबंधित आजार आहे. हा आजार लहान मुलांमध्ये आढळतो. हा आजार मेंदूला झालेल्या दुखापतीमुळे होतो. तो लहान मुलांमध्ये किंवा चार वर्षांखालील मुलांमध्ये दिसून येतो. हा आजार संसर्गजन्य नाही. हे मेंदूला झालेल्या नुकसानीमुळे होतं, जे सहसा जन्मापूर्वी, जन्मादरम्यान किंवा जन्मानंतर लगेच होतं. या आजाराची लक्षणं प्रत्येकामध्ये वेगवेगळी दिसतात.
सेरेब्रल पाल्सी हा मेंदूच्या असामान्य विकासामुळे किंवा विकसनशील मेंदूला झालेल्या नुकसानीमुळे होतो. तो सहसा मुलाच्या जन्मापूर्वी उद्भवतो, परंतु तो जन्माच्या वेळी किंवा नंतर देखील होऊ शकतो. अनेक प्रकरणांमध्ये, याचं कारण अज्ञात आहे.
Published by:Kiran Pharate
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.