जाहिरात
मराठी बातम्या / देश / युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी सरकारचा मोठा निर्णय, दोन तासांच्या बैठकीत ठरलं प्लानिंग

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी सरकारचा मोठा निर्णय, दोन तासांच्या बैठकीत ठरलं प्लानिंग

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी सरकारचा मोठा निर्णय, दोन तासांच्या बैठकीत ठरलं प्लानिंग

Russia-Ukraine War: युक्रेन आणि रशियामधील (Ukraine and Russia) युद्ध अजूनही सुरूच आहे. मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी युद्धग्रस्त युक्रेनमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी राजधानी दिल्लीत बैठक बोलावली.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी: युक्रेन आणि रशियामधील (Ukraine and Russia) युद्ध अजूनही सुरूच आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रचार आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी युद्धग्रस्त युक्रेनमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी राजधानी दिल्लीत बैठक बोलावली. ही बैठक रविवारी रात्री 8 वाजता सुरू झाली, ज्याचा मुख्य अजेंडा युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणण्याचा होता. परराष्ट्र सचिव (Foreign Secretary) हर्षवर्धन श्रृंगला यांनी या विषयावर पंतप्रधानांना सादरीकरण केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनमधील परिस्थितीवर नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेतली. ही बैठक 2 तास चालली. बैठकीत नरेंद्र मोदींनी भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर आणि बाहेर काढण्यावर भर दिला. यावेळी पीएम मोदी म्हणाले, युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि त्यांना बाहेर काढणं ही प्राथमिकता आहे. विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी युक्रेनच्या शेजारील देशांसोबत अधिक सहकार्य केले जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत सरकार ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत 2 मार्चपर्यंत आणखी 7 चार्टर फ्लाइटची व्यवस्था करत आहे. इंडिगो एअरलाइन कंपनी यापैकी 2 फ्लॅट चालवणार आहे. सध्या युक्रेनमध्ये सुमारे 16000 भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. तसंच युक्रेनमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी मदत करण्यासाठी एक समर्पित ट्विटर हँडल तयार करण्यात आलं आहे, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. युक्रेनमध्ये अडकले भारतीय युक्रेनमध्ये रशियन युद्धापूर्वी 20,000 हजार भारतीय उपस्थित होते. त्यापैकी 4000 प्रवासी युद्ध सुरू होण्यापूर्वी भारतात आले. युद्ध सुरू झाल्यानंतर भारतानं नागरिकांच्या परतीसाठी ऑपरेशन गंगा सुरू केलं आहे. याअंतर्गत आतापर्यंत चार उड्डाणे झाली आहेत. पहिल्या विमानात 270 भारतीय मुंबईत पोहोचले होते. यानंतर दुसऱ्या विमानामध्ये 250 भारतीय आणि तिसऱ्या विमानातून 240 प्रवासी भारतात पोहोचले. चौथ्या विमानानं 198 भारतीयांना बुखारेस्टहून दिल्लीला नेलं. रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेननं आपल्या हवाई सीमा बंद केल्या. अशा परिस्थितीत भारतीय नागरिकांना युक्रेनमधून हंगेरी, पोलंड, स्लोव्हाकिया आणि रोमानियामध्ये रस्त्यानं आणलं जात आहे. तेथून ते विमानानं भारतात येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात