मराठी बातम्या /बातम्या /देश /

क्रूरतेचा कळस! कुत्र्याला फुगे बांधून त्याला हवेत उडवलं, YouTuber ला अटक

क्रूरतेचा कळस! कुत्र्याला फुगे बांधून त्याला हवेत उडवलं, YouTuber ला अटक

युट्यूबवर (YouTube) वर व्हिडीओ पोस्ट करण्यासाठी एका तरुणाने श्वानाला त्रास दिल्याचा आरोप केला जात आहे. त्याने त्या कुत्र्याला त्रास दिल्याची तक्रार मालवीय नगर पोलीस स्टेशनमध्ये (Malviya Nagar Police Station) करण्यात आली आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 27 मे: प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेक गोष्टींचा आधार घेतला जातो, अलीकडे सोशल मीडिया (Social Media) याकरता महत्त्वाचे माध्यम बनले आहे. अनेकजण याचा सदुपयोग करून चांगला कंटेट प्रेक्षकांना देतात, मात्र काहीजण याचा दुरुपयोग करण्याचा मार्ग निवडतात. अशाप्रकारे झटपट प्रसिद्धी मिळवताना आपण काही गुन्हा करतो आहोत हे देखील अनेकांच्या ध्यानात येत नाही. दक्षिण दिल्लीतून (South Delhi) देखील असाच एक प्रकार समोर आला आहे. युट्यूबवर (YouTube) वर व्हिडीओ पोस्ट करण्यासाठी एका तरुणाने श्वानाला त्रास दिल्याचा आरोप केला जात आहे. त्याने त्या कुत्र्याला त्रास दिल्याची तक्रार मालवीय नगर पोलीस स्टेशनमध्ये (Malviya Nagar Police Station) करण्यात आली आहे. पोलिसांनी या युट्यूबरला अटक केली आहे.

पीपल्स फॉर अॅनिमल्स सोसायटी (People for Animals Society) या संस्थेच्या गौरव गुप्ता यांनी संबंधित तक्रार मालवीय नगर पोलीस स्टेशनमध्ये केली होती.  त्यांनी असा आरोप केला होता की, गौरव शर्मा या 32 वर्षीय तरुणाने एक व्हिडीओ बनवला होता. ज्यामध्ये त्याने हेलियमच्या फुग्यांना एका पाळीव कुत्र्याला बांधले होते. फुगे हवेत सोडल्यानंतर कुत्रा देखील हवेत उडू लागला होता आणि त्यामुळे त्याचा जीव धोक्यात आला होता अशी तक्रार गुप्ता यांनी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ 21 मे रोजी शूट करण्यात आला होता. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गौरव गुप्ता यांनी पुढाकार घेत तक्रार नोंदवली होती.

सोशल मीडियावर या तरुणाविरोधात प्रतिक्रिया उमटल्या आहेत-

" isDesktop="true" id="556412" >

हे वाचा-अरे बापरे! बाळासोबत व्हिडीओ शूट करताना अचानक घोडी बनली महिला...; पाहा हा VIDEO

भादवी कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि कलम 11 (1) (ए) आणि कलम 11 (1) (डी) पशु क्रूरता प्रतिबंधक कायदा या अंतर्गत पी.एस. मालवीय नगर याठिकाणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोप गौरव शर्मा मालवीय नगरमधीलच पंचशील विहार याठिकाणचा रहिवासी आहे. त्याने असा जबाब दिला आहे की तो एक युट्यूबर आहे आणि त्याच कारणास्तवर त्याने असा व्हिडीओ बनवला होता.

First published:

Tags: Dog, Shocking video viral, Shocking viral video, Video viral, Viral