Home /News /viral /

अरे बापरे! बाळासोबत व्हिडीओ शूट करताना अचानक घोडी बनली महिला...; विश्वास बसत नाही तर पाहा हा VIDEO

अरे बापरे! बाळासोबत व्हिडीओ शूट करताना अचानक घोडी बनली महिला...; विश्वास बसत नाही तर पाहा हा VIDEO

मोबाईलवर व्हिडीओ शूट करताना महिलेचा चेहरा अचानक लांब होत गेला आणि...

  मुंबई, 26 मे :  सोशल मीडियावर (Social media) तसे बरेच व्हिडीओ व्हायरल (Viral video) होत असतात. काही व्हिडीओ तर इतके विचित्र असतात की ते पाहूनही डोळ्यांवर विश्वास बसत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यात एक महिला चक्क घोडी बनली (Woman becomes mare) आहे. कुशीत बाळ आणि अवघ्या काही सेकंदातच घोडी बनलेल्या या आईचा व्हिडीओ (Mother becomes mare) समोर आला आहे. सेल्फी घेणं किंवा स्वतःचा व्हिडीओ शूट करणं तसं नवं नाही. काही जण तर आपल्या चिमुकल्या मुलांना सोबत घेऊनही असे व्हि़डीओ शूट करतात. अशाच एका आईने आपल्या बाळाला आपल्या कुशीत घेतलं. आपल्या दुसऱ्या हातात तिने मोबाईल फोन धरला आणि व्हिडीओ शूट करत होती. त्यावेळी पुढे जे घडलं ते आश्चर्यचकित करणारं आहे.
  व्हिडीओत पाहू शकता व्हिडीओ शूट करताना महिलेच्या चेहऱ्याचा आकार बदलू लागतो. तिचा चेहरा लांब होत जातो आणि त्यानंतर तिच्या चेहरा घोडीच्या चेहऱ्यात बदलतो. आईचं हे असं रूप पाहून चिमुकलासुद्धा घाबरतो आणि तो रडायलाच लागतो. हे वाचा - कधीच पाहिला नसेल असा दरोडा; फक्त बघू नका तर नीट ऐका हा VIDEO बरं हा व्हिडीओ पाहिल्यानंतर यामध्ये तसं काही खरं नाही, हे तर तुम्हालाही माहिती झालं असेल. या महिलेने मजा म्हणून आपल्या चिमुकल्यासोबत असा व्हिडीओ केला आहे.  सध्या टेक्नॉलॉजीमुळे खूप काही शक्य झाले आहे. असे अनेक अॅप आले आहेत, ज्या अशक्यही शक्य करणं शक्य होतं. जे पाहिल्यानंतर लोकांनाही आश्चर्य वाटतं. अशाच प्रकारे तयार करण्यात आलेला हा व्हिडीओ आहे. हे वाचा - Circus चा खेळ पडला उलटा! 2 सिंहांनी ट्रेनरचेच पाय धरले आणि...; खतरनाक VIDEO महिलेने इन्स्टाग्रामवरील फिचरचा वापर करून हा व्हिडीओ तयार केला आहे. आपल्या मुलाला घाबरण्यासाठी तिने हे फिचर वापरलं. ज्याचा काय परिणाम झाला तो तुम्हाला या व्हिडीओत दिसतोच आहे. तसं हे फिचर अनेकांना माहिती असेल, अनेकांनी वापरलंसुद्धा असेल. पण तरीसुद्धा हा व्हिडीओ खूप व्हायरल होतो आहे. त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येता आहेत.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Funny video, Viral, Viral videos

  पुढील बातम्या