तिरुअनंतपुरम, 30 नोव्हेंबर: कर्जबाजारी झालेल्या एका तरुणानं आपल्या पत्नीची किडनी विकण्याचा हट्ट (Husband forced wife to sell her kidney) धरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी तरुणानं डोक्यावरील कर्जाची परतफेड करण्यासाठी थेट आपल्या पत्नीच्या किडनीचा सौदा केला (Wife’s kidney deal) होता. पण संबंधित महिलेनं आपली किडनी विकण्यास नकार दिल्याने आरोपीनं पीडितेला मारहाण (Husband beat wife) केली आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपी नवऱ्याला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. संबंधित घटना केरळ (kerala) राज्यातील तिरुअनंतपुरम येथील आहे. तर अटक केलेल्या आरोपी पतीचं नाव साजन आहे. आरोपी साजन याच्यावर चार लाख रुपयांचा कर्ज होतं. डोक्यावरील कर्ज कसं फेडायचं याची चिंता त्याला सतावत होती. यातूनच आरोपीनं आपल्या पत्नीची किडनी विकण्याचा निर्णय घेतला. आरोपीनं मलप्पुरम जिल्ह्यातील एका रहिवाश्याला किडनी विकण्याचा करार देखील केला होता. करारानुसार संबंधित व्यक्ती आरोपीला एका किडनीच्या बदल्यात 9 लाख रुपये देणार होता. हेही वाचा- बर्थडेला नेलं अन् पत्नीला केलं मित्रांच्या हवाली, गँगरेपच्या घटनेनं हादरली मुंबई या पैशातून चार लाख रुपयांच्या कर्जाची परतफेड करायची आणि उर्वरित 5 लाख रुपयांत आपलं आयुष्य आरामात घालवायचं असा त्याचा डाव होता. त्यासाठी त्याने आपल्या पत्नीकडे किडनी देण्यासाठी तगादा लावला होता. पण किडनी दात्याला किडनी दान करण्यापूर्वी विविध वैद्यकीय चाचण्या कराव्या लागतात. त्यामुळे पीडित महिलेनं आपली किडनी देण्यास नकार दिला. हेही वाचा- एक बाटली आणि चौघांचा बळी; सुसाट कारने 100 फूट हवेत उडवलं, थरारक घटनेचा VIDEO यामुळे संतापलेला पती साजन याने आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली आहे. मारहाण झाल्यानंतर पीडित महिलेनं पोलीस ठाणे गाठत आपल्या पतीविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पतीचा प्रताप ऐकून पोलीसही हैराण झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.