मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

बर्थडेला नेलं अन् पतीनं केलं पत्नीला मित्रांच्या हवाली, सामूहिक अत्याचाराच्या घटनेनं हादरली मुंबई

बर्थडेला नेलं अन् पतीनं केलं पत्नीला मित्रांच्या हवाली, सामूहिक अत्याचाराच्या घटनेनं हादरली मुंबई

(प्रातिनिधीक फोटो)

(प्रातिनिधीक फोटो)

Gang Rape in Mumbai: मुंबईतील आंबोली याठिकाणी नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. येथील एका तरुणानं आपल्या पत्नीला मित्राच्या वाढदिवसाला (Went for friend's birthday party) घेऊन जात, तिच्यावर सामूहिक अत्याचार (Gang rape on wife) करवला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 30 नोव्हेंबर: मुंबईतील आंबोली याठिकाणी नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. येथील एका तरुणानं आपल्या पत्नीला मित्राच्या वाढदिवसाला (Went for friend's birthday party) घेऊन जात, तिच्यावर सामूहिक अत्याचार (Gang rape on wife) करवला आहे. आरोपी पतीनं मित्राच्या घरी सुरू असलेल्या वाढदिवसाच्या पार्टीत आपल्या पत्नीला दारू पाजून (Give alcohol to drink) तिला मित्रांच्या हवाली केलं आहे. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने स्वत:ही  बेशुद्धावस्थेतील पत्नीवर बलात्कार केला आहे. पीडित महिलेला शुद्ध येताच आरोपींनी पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

पीडितेनं घडलेला सर्व प्रकार आपल्या घरच्यांना सांगितल्यानंतर या घटनेला वाचा फुटली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी घटनेच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी नजीकच्या पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी पतीसह त्याच्या मित्रांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीसह त्याच्या मित्राला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास आंबोली पोलस करत आहेत.

हेही वाचा-बापाने फिल्मी स्टाईलनं मुलीच्या प्रियकराचा काढला काटा; थरारक घटनेचं उलगडलं गूढ

नेमकं काय घडलं?

मुंबईच्या आंबोली परिसरातील रहिवासी असणाऱ्या युवकाने वाढदिवसाची पार्टी असल्याचं सांगत आपल्या पत्नीला मित्राच्या घरी घेऊन गेला होता. मित्राच्या घरी पार्टी सुरू असताना, आरोपीनं पीडित महिलेला दारू पाजली. दारू प्यायल्याने पत्नीची शुद्ध हरपली. पण काही तासानंतर पीडित महिलेला शुद्ध आल्यानंतर ती एका बेडवर पडली होती. तसेच तिच्या अंगावरील कपडे अस्ताव्यस्त झाली होती. त्यामुळे पीडितेला तिच्यासोबत काय घडलं याचा अंदाज आला.

हेही वाचा-'हत्या केली पण..', कुर्ल्यातील तरुणीसोबत काय केलं? आरोपीनेच केला संतापजनक खुलासा

याप्रकरणी पीडितेनं जाब विचारला असता, आरोपी पती आणि त्याच्या मित्राने घटनेची वाच्यता केल्यास तुला जीवे मारू अशी धमकी दिली. यानंतर पीडित महिला पतीसोबत आपल्या घरी गेल्यानंतर, घडलेल्या प्रकरणावरून दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती पीडित महिलेच्या कुटुंबीयांना मिळताच, घटनेच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी पीडितेच्या कुटुंबीयांना पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीसह त्याच्या मित्राला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Gang Rape, Mumbai