मोहाली, 30 नोव्हेंबर: रविवारी दुपारी दीडच्या सुमारास एका वेगवान कारने दोन रिक्षाचालकांना चिरडल्याची (Speedy car hits 2 rickshaw driver) धक्कादायक घटना समोर आली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही रिक्षाचालकांचा जागीच तडफडून मृत्यू (Dead) झाला आहे. तर कारमधील अन्य दोघांनी रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला आहे. अपघातात एकूण चार जणांचा मृत्यू (4 Died in terrible road accident) झाला असून अन्य तिघेजण गंभीर जखमी (3 injured) झाले आहेत. या भीषण अपघाताचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ (Accident video) समोर आला सोशल मीडियात वेगाने व्हायरल होतं आहे. हा अपघात मोहाली येथील घडुंआ परिसरातील चंदीगड विद्यापीठासमोर घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कारमधून 5 जण प्रवास करत होते. संबंधित सर्वजण रविवारी कारने चंदीगडहून लुधियानाला जात होते. दरम्यान दुपारी दीडच्या सुमारास घडुंआ परिसरातील चंदीगड विद्यापीठासमोरून जात असताना, सुसाट वेगानं जाणाऱ्या या कारने रस्त्याच्या दुभाजकाला जोरदार धडक दिली आहे. यावेळी दुभाजकाजवळ उभ्या असणाऱ्या दोन रिक्षाचालकांना कारने चिरडलं आहे. हेही वाचा- बर्थडेला नेलं अन् पत्नीला केलं मित्रांच्या हवाली, गँगरेपच्या घटनेनं हादरली मुंबई हा अपघात इतका भीषण होता की, कारने संबंधित दोन्ही रिक्षाचालकाने थेट हवेत उडवलं आहे. जवळपास 100 फूट लांब जाऊन पडलेल्या दोन्ही रिक्षाचालकांचा जागीच तडफडून मृत्यू झाला आहे. तर कारमधील पाचही जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील दोन जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असून अन्य तिघांवर उपचार सुरू आहे. त्या तिघांची प्रकृती देखील चिंताजनक आहे.
तस्वीरें देखेंगे हैरान हो जाएंगे...#शराब ने खुद को तो मारा दो बेकसूर लोगों की भी जान ले ली#मोहाली में रफ्तार का दिखा कहर
— Sonu Sharma (Journalist) Ex ब्लू टिकधारी (@jr_sonusharma) November 30, 2021
तेज रफ्तार कार ने डिवाइडर से लगाई छलांग
हादसे का #CCTV आया सामने
हादसे में चार लोगों की हुई मौत #Mohali #punjab #breaking #ACCIDENT @jr_sonusharma pic.twitter.com/gPNvzxJmSa
सुरिंदर सिंग (41) आणि जमील खान (40) असं मृत पावलेल्या दोघांची नावं असून दोघंही रिक्षाचालक होते. तर कारमधील मृतांपैकी एकाचं नाव संजीत सिंग (26) असं आहे. पीजीआयमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या आणखी एका व्यक्तीची ओळख पटलेली नाही. या अपघाताच्या वेळी तोही कारमध्येच होता. धक्कादायक बाब म्हणजे कारमधील सर्वजण दारूच्या नशेत होते. पोलिसांना कारमध्ये एक दारूची बाटली देखील आढळून आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.