Home /News /national /

भर चौकीत आरोपीनं धारधार चाकूने कापला पोलिसाचा कान, कारण वाचून व्हाल हैराण

भर चौकीत आरोपीनं धारधार चाकूने कापला पोलिसाचा कान, कारण वाचून व्हाल हैराण

फोटो-आज तक

फोटो-आज तक

रागाच्या भरात पोलीस स्थानकातच या तरुणानं पोलीस कर्मचाऱ्याचा कान कापला. आरोपी युवकाने पोलिसांना शिवीगाळही केल्याचेही सांगितले जात आहे.

    अशोक नगर (मध्य प्रदेश), 22 मे : गेल्या काही दिवसांपासून पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढत आहे. असाच धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशातील अशोक नगर जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमध्ये घडला. पोलीस चौकीतच एका युवकानं रागाच्या भरात पोलीस कर्मचाऱ्याचे कान कापले. असे सांगितले जात आहे की आरोपी तरुणांनाला पोलिसांनी मास्क घालूनच आत येण्यास सांगितले. मात्र आरोपीनं मास्क घालण्यास नकार दिला. त्यानंतर रागाच्या भरात पोलीस स्थानकातच या तरुणानं पोलीस कर्मचाऱ्याचा कान कापला. आरोपी युवकानं पोलिसांना शिवीगाळही केल्याचंही सांगितलं जात आहे. मध्य प्रदेशातील अशोकनगरमधील बहादूरपूर पोलीस चौकीत ही घटना घडली. असं सांगितलं जात आहे की पोलीस कर्मचाऱ्यांनी मास्क न वापरता आत येऊ नको असं सांगितल्यावर तो परत गेला, परंतु थोड्या वेळाने तो पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये आला. त्यानंतर आरोपीनं पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलीस चौकीतील कॉन्स्टेबल शाहिद खानने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मास्क न वापरल्यामुळं पोलिसांनी त्याला दुरून बोलण्यास सांगितलं. यामुळे रागात या युवकानं खिशातून चाकू काढला आणि शाहिद खान यांचा कान कापला. वाचा-'मित्रांनो काळजी करू नका', जिगरबाज पोलिसांनं सहकाऱ्यांना दिला धीर वाचा-विकृती! वासनेची भूक भागवसाठी दफन केलेला मुलीचा मृतदेह काढला बाहेर, शरीरसंबंध ठेव इतर पोलीसांवरही केला हल्ला आज तक या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, शाहिद खान यांच्यावर आरोपीनं आणखी एक हल्लाही कला. यात कॉन्स्टेबल राजेश परिहारगही जखमी झाले. यात कॉन्स्टेबलच्या हाताचे बोट कापले. घटनेनंतर आरोपी तरुण पोलीस स्टेशनमधून पळून गेला. मात्र, काही काळानंतर पोलिसांनी त्याला पुन्हा अटक केली. बातमीनुसार एसडीओपी स्वाती गुप्ता यांनी माध्यमांशी या विषयावर चर्चा केली. एसडीओपी गुप्ता म्हणाले की, धीरा चक्र असे या आरोपीचे नाव असून त्याचे वय 23 वर्षे आहे. सुरुवातीच्या तपासणीत माहिती गोळा केली असता, तो तरुण स्वभावाने विक्षिप्त असल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. वाचा-संपर्कात न येता कोरोनाचे शिकार, घरातून बाहेर पडले नाही तरी 61 जण पॉझिटिव्ह
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona, Police attack

    पुढील बातम्या