मुंबई, 22 मे : कोरोनाचा धोका आता पोलीस दल आणि आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही वाढत असल्याचं दिसत आहे. कोरोनामुळे बुधवारी 3 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या कोरोनाच्या धोक्यामुळे पोलीस दलासह कुटुंबीयांमध्येही भीतीचं वातावरण आहे. पोलिसांनी मात्र कोरोनाविरुद्धच्या लढाईत हार मानली नाही. नागरिकांसाठी अहोरात्र आपलं कर्तव्य नेटानं बजावत आहेत.
आपलं कर्तव्य बजावत असताना मरोळ पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका पोलिसाला कोरोनाची लागण झाली. उपचारासाठी रुग्णवाहिकेतून जाण्याआधी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना हार मानायची नाही. काळजी करू नका मी लवकरच पुन्हा येईन असा धीर दिला. आपल्यासोबतच्या सहकाऱ्यांच्या मनातील कोरोनाची भीती दूर करून त्यांच्या मनात उमेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते.
हे वाचा-नक्षलवादी हल्ल्यात वडिलांना गमावलं, कोरोनाशी लढताना पोलीस आईने सोडले प्राण
ड्युटीदरम्यान त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांना उपचारासाठी सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या कुटुंबीयांपैकी पत्नीचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. दुसऱ्या टेस्टमध्ये पोलीस कर्मचाऱ्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला पण सध्या पत्नीवर उपचार सुरू असल्यानं व्हिडीओ कॉलवरून त्यांनी पत्नीलाही धीर दिला.
कोरोनाविरुद्धचा यशस्वी लढा देऊन संकेत घोसळकर पुन्हा आपलं कर्तव्य बजावण्यासाठी रुजू झाले आहेत. यावेळी त्यांनी सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगितली आपला धीर सोडायचा नाही. येणाऱ्या संकटाला खंबीरपणे आणि धैर्यानं समोरं जायचं असं त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह नागरिकांनाही सांगितलं आहे.
हे वाचा-क्वारंटाइन सेंटरमधला धक्कादायक प्रकार, महिलांना साड्यांऐवजी दिली लुंगी
संपादन- क्रांती कानेटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.