Home /News /crime /

विकृती! वासनेची भूक भागवसाठी दफन केलेला मुलीचा मृतदेह काढला बाहेर, शरीरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न

विकृती! वासनेची भूक भागवसाठी दफन केलेला मुलीचा मृतदेह काढला बाहेर, शरीरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न

लॉकडाऊनमध्ये वासनेच्या आहारी गेलेल्या नराधमाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

    धेमाजी (आसाम), 22 मे : देशात रोज म्हटलं तरी अल्पवयीन मुली, युवती आणि महिलांवर अत्याचाराच्या घटना समोर येत असतात. परंतु लॉकडाऊनमध्ये वासनेच्या आहारी गेलेल्या नराधमाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हवस भागवण्यासाठी 51 वर्षीय नराधमाने अल्पवयीन मुलीचा दफन केलेला मृतदेह बाहेर काढला आणि तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळावरून आरोपीला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला आहे. पोलीस चौकशीत आरोपीनेही हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. एचटीच्या अहवालानुसार, धेमाजी पोलास अधीक्षक (एसपी) धनंजय घनवट यांनी सांगितलं की, अटक केलेल्या आरोपीचं नाव अकान सैकिया आहे. 17 मे रोजी 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला. सामेना नदीच्या काठी तिला दफन करण्यात आलं. दुसर्‍याच दिवशी आरोपीने कबर खोदली आणि मृतदेह बाहेर काढून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. यावेळी काही ग्रामस्थांनी त्याला पाहिलं आणि पोलिसांना कळवलं. क्वारंटाइन सेंटरमधला धक्कादायक प्रकार, महिलांना साड्यांऐवजी दिली लुंगी आरोपीविरोधात गुन्हा दाखल एसपी घनवट यांनी सांगितलं की, आरोपी अकानवर भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम 306 आणि 377 अन्वये चिल्ड्रन प्रोटेक्शन, अप्राकृतिक लैंगिक अत्याचार व लैंगिक गुन्हे कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अकान मानसिकदृष्ट्या ठीक नसून तो मनोरुग्ण असल्याचं समोर आलं आहे. तो पोलीस स्टेशनचा हिस्ट्रीशीटर देखील आहे. तर काही दिवसांआधी याच आरोपीने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रयत्न केला. आणि यातून तिने आत्महत्या केली. म्हणून माथेफीरू आरोपीने तिचा मृतदेह कबरेतून काढून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्नही केला आहे. नक्षलवादी हल्ल्यात वडिलांना गमावलं, कोरोनाशी लढताना पोलीस आईने सोडले प्राण कोरोना विषाणूच्या साथीमुळे आरोपी पॅरोलवर तुरुंगातून आला बाहेर एसपी घनवट यांनी सांगितलं की, आरोपीने दोन विवाह केले आहेत. वर्ष 2018 मध्ये आरोपीच्या पत्नीने त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान तो दोषी आढळला आणि त्याला तुरूंगात पाठवण्यात आलं. कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर मार्च महिन्यात त्याला पॅरोलवर सोडण्यात आलं होतं. राज्यात खरंच मंदी आहे का? दारूविक्रीचे आकडे वाचून तुम्ही व्हाल थक्क संपादन - रेणुका धायबर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Rape news

    पुढील बातम्या