इंदूर, 22 मे : देशात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारताचा मृत्यूदर इतर देशांच्या तुलनेत कमी असला तरी ही चिंतेची बाब आहे. यातच आता मध्य प्रदेशातील हॉटस्पॉट असलेल्या इंदूरमध्ये घरातून बाहेरही न पडलेल्या लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. हे रुग्ण ना कोणाच्या संपर्कात आले ना घराबाहरे पडले, तरी ते कोरोनाचे शिकार झाले. त्यामुळं आता अशा रुग्णांनी आरोग्य विभागाच्या चिंता वाढवल्या आहेत. इंजूरमध्ये आतापर्यंत असे 61 रुग्ण सापडले आहेत. दुसरीकडे इंदूर हॉटस्पॉट असल्यामुळं आता लोकांची चिंता वाढली आहे.
दरम्यान, कडक बंदोबस्त असूनही इतक्या मोठ्या संख्येने रूग्ण का संक्रमित होत आहेत याचा तपास आता इंदूरमधील आरोग्य अधिकारी करीत आहेत. 50 टक्के प्रकरणांमध्ये, रुग्णाची कॉंटॅक्ट हिस्ट्री किंवा ट्रेव्हल हिस्ट्री माहित नाही. शहरातील सर्वाधिक संसर्गग्रस्त रुग्ण खजराना भागात आढळले आहेत. आतापर्यंत 178 रुग्ण येथे आले आहेत. जेव्हा या रूग्णांची चौकशी केली गेली तेव्हा असे आढळले की काही रुग्ण सामान्य आजारांच्या उपचारासाठी रुग्णालयात गेले होते आणि संसर्गाला बळी पडले.
वाचा-नक्षलवादी हल्ल्यात वडिलांना गमावलं, कोरोनाशी लढताना पोलीस आईने सोडले प्राणया रुग्णांनी वाढवली चिंता
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, इंदूरमध्ये कोरोनाचे 61 रुग्ण असे आहेत, जे घराबाहेर पडले नाहीत किंवा कोणाच्या संपर्कात आले नाही. कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या या भागात राहण्यामुळे त्यांना संसर्ग झाला. आतापर्यंत जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाला त्यांना संसर्ग होण्याचे कारण कळू शकलेले नाही. जरी परदेशातील इंदूरमधील खजाना परिसर आपल्या गणेश मंदिरासाठी प्रसिद्ध आहे, परंतु सध्या हे क्षेत्र कोरोनामधील सर्वात मोठा हॉटस्पॉट झाले आहे. आतापर्यंत या भागात 178 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
वाचा-धक्कादायक! कोरोनाचा धोका वाढला, स्वॅब घेतल्यानंतर अवघ्या तासभरात रुग्णांचा मृत्यवाचा-देशात कोरोनाने रेकॉर्ड तोडला, 24 तासांत 6088 नव्या रुग्णांची नोंद
Published by:Priyanka Gawde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.