• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • तुम्ही आम्हाला दहशतवादी म्हणा, पण.., शेतकऱ्यांनी मोदी सरकारला बजावले

तुम्ही आम्हाला दहशतवादी म्हणा, पण.., शेतकऱ्यांनी मोदी सरकारला बजावले

'पुढील सहा महिन्याचे राशन घेऊन आम्ही आलो आहे. त्यामुळे सरकारने आम्ही येथून हटू असा विचार करू नये, सरकारला आमच्या मागण्या मान्य कराव्याच लागतील'

  • Share this:
नवी दिल्ली, 15 डिसेंबर : कृषी कायद्याविरोधात (farmers act 2020) दिल्ली मेरठ सीमा भागावर असलेल्या गाजीपूर बॉर्डरवर गेल्या 20 दिवसांपासून शेतकऱ्यांयाचे आंदोलन (farmers protest) सुरू आहे. जोपर्यंत सरकार आमच्याा मागण्या माान्य करत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील. आतापर्यंत 6 वेळा शेतकरी संघटनांच्या विविध प्रतिनिधींनी केंद्र सरकारसोबत चर्चा केली. पण सरकार आमची फसवणूक करण्यासाठी उतावीळ झाली आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. 'पुढील सहा महिन्याचे राशन घेऊन आम्ही आलो आहे. त्यामुळे सरकारने आम्ही येथून हटू असा विचार करू नये, सरकारला आमच्या मागण्या मान्य कराव्याच लागतील, असा सूर शेतकऱ्यांचा आहे. 'आम्ही आमची शेती सोडून दिल्लीच्या रस्त्यावर बसलो आहे. त्यामुळे सरकारने आम्हाला न्याय द्यावा, अशी सरकारकडून अपेक्षा आहे. शेतकरी चर्चेसाठी तयार आहे. पण सरकारने दोन तोंडाची भूमिका घेऊ नये, अशी मागणी गाजीपूर बॉर्डरवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी केली आहे. जलयुक्त शिवार योजना चौकशीवरून फडणवीसांनी अधिवेशनात दिले उत्तर, म्हणाले... तसंच' संपूर्ण दिल्लीत वीज पुरवठा सुरळीत आहे पण आमच्याा आंदोलनस्थळी मात्र अंधार केला आहे. आम्ही कडाक्याच्या थंडीत त्यांच्या भवितव्यासाठी लढत आहोत. त्यामुळे सरकार कितीही दुटप्पी झाले तरी आम्ही ही लढत कायम ठेवणार आहोत. सरकारने आमच्या मुला-बाळांचा विचाार करावा आणि  आम्हाला न्याय द्यावा हीच आमची अपेक्षा आहे', अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली. धक्कादायक! पुण्यात माजी आमदारांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल संपूर्ण जगातून या आंदोलनात मदत करण्यात येत आहे. आमच्यावर दहशतवादी असल्याचा आरोप सरकार करत आहे. पण आम्हाला याची काहीच पर्वा नाही. आम्हाला निश्चित न्याय मिळेल. सरकारने आमचा अंत पाहू नये', अशी विनंतीही शेतकऱ्यांनी केली.
Published by:sachin Salve
First published: