जलयुक्त शिवार योजना चौकशीवरून फडणवीसांनी अधिवेशनात दिले उत्तर, म्हणाले...

'नवीन सरकार आले म्हणून त्यांनी योजना बंद केली. आता याच योजनेला पर्यायी योजना आणली आहे. याला मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना असं नाव दिले'

'नवीन सरकार आले म्हणून त्यांनी योजना बंद केली. आता याच योजनेला पर्यायी योजना आणली आहे. याला मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना असं नाव दिले'

  • Share this:
    मुंबई, 15 डिसेंबर : महाविकास आघाडी सरकारने जलयुक्त शिवार योजनेबद्दल (jalyukta shivar yojana) तक्रारी आल्या म्हणून चौकशीचे आदेश दिले आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी हिवाळी अधिवेशनात (maharashtra-winter-assembly-session-2020) पहिल्यांदाच उत्तर दिले आहे. जलयुक्त शिवार योजना ही फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना होती. अधिवेशनात पुरवणी मागण्यावर बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजनेवरून आपली भूमिका मांडला आहे. 'जलयुक्त शिवार योजनेची जरूर चौकशी करा. या योजनेबद्दल 700 तक्रारी आल्या होत्या. तुम्ही आता नवीन समिती तयार केली याचा आनंद आहे. या योजनतेी त्याची पूर्ण चौकशी करावी. 5 लाख कामं झाली आहे. त्यापैकी 700 तक्रारी आल्या आहेत.  या योजनेच जिल्हाधिकारी हे प्रमुख होते. यात ग्रामविकास, जलसंधारण, कृषी विभागासह अनेक विभागांची काम आहे' असं फडणवीस म्हणाले. तसंच, 'जलयुक्त शिवार योजनेचे ज्या गावात काम केले आहे अशा 5 हजार गावांमध्ये जलयुक्त शिवारमुळे झालेल्या परिवर्तनाच्या कथा सांगणार आहोत. जलयुक्त शिवार योजनेमुळे परिवर्तन कसे झाले याची माहिती देणार आहोत' असंही फडणवीस म्हणाले. तसंच 'नवीन सरकार आले म्हणून त्यांनी योजना बंद केली. आता याच योजनेला पर्यायी योजना आणली आहे. याला मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना असं नाव दिले. या राज्यात जलसंधारणाच्या 14 योजना सुरू होत्या. त्या एकत्र करून एक योजना केली होती.  या योजनेला 300 कोटींची तरतूद केली आहे. पण, अजूनही साधा शासकीय अध्यादेशही काढला नाही' असा आरोपही फडणवीस यांनी केला. 'ओबीसी आरक्षणात वाटेकरी केले तर रस्त्यावर उतरू' 'सरकारने निसंदिग्धपणे सांगावं की ओबीसी आरक्षणात कोणी वाटेकरी नाही. कायद्यात ओबीसी आरक्षणाला संरक्षण दिले आहे. जर कुणी ओबीसी आरक्षणात वाटेकरी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही रस्त्यावर उतरू' असा इशाराच फडणवीस यांनी दिला. 'धनगर समाजाला आरक्षण देण्यााचा मुद्दा सुप्रीम कोर्टात गेला आहे. त्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली नाही. आम्ही केसला वेळ लागेल म्हणून आदिवासी समाजाला ज्या सवलती दिल्या त्या धनगर समाजाला दिल्या होत्या. पण महाविकास आघाडी सरकारने आता सर्व सवलती बंद केल्या आहे' असा आरोपही फडणवीस यांनी केला.
    Published by:sachin Salve
    First published: