हमीरपूर (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्यांचा नाच टिकटॉक व्हिडिओच्या माध्यमातून व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये नाचणारे हे मंत्री उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री बाबुराम निषाद आहेत.ते एका व्हर्च्युअल मोटरसायकलवर स्वार होऊन व्हर्चुअल हेल्मेट घालून डोलतायत.
सध्या तरुण मुलं आणि महिलांमध्येही टिकटॉक व्हिडिओची चांगलीच क्रेझ आहे. टिकटॉक व्हिडिओ अपलोड करून सेलिब्रिटी बनू पाहणारे अनेक जण आहेत. त्यातच आता उत्तर प्रदेशच्या या मंत्र्यांचाही व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड झाला आहे.या व्हिडिओच हे मंत्री बनियन घालून बाइक चालवतातयत आणि गाण्यावर नाचतायत. शरद पवारांवर झालेल्या कारवाईशी सरकारचा संबंध नाही, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण झमाझम नाच राजे… ढमा ढम ढोल बाजे..या गाण्यावर नाचताना हे मंत्रिमहोदय चांगलेच रंगात आलेत. बाबू राम निषाद हे योगी सरकारमधल्या मागासवर्गीय विकास आयोगाचे अध्यक्ष आहेत. टिकटॉकवरचा हा व्हिडिओ त्यांनी स्वत: बनवला आहे. ================================================================================= VIDEO: पवारांवरील कारवाईनंतर बारामीतकरांमध्ये रोष, रस्त्यावर उतरून केली निदर्शनं

)







