जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शरद पवारांवर झालेल्या कारवाईशी सरकारचा संबंध नाही, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

शरद पवारांवर झालेल्या कारवाईशी सरकारचा संबंध नाही, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

शरद पवारांवर झालेल्या कारवाईशी सरकारचा संबंध नाही, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 सप्टेंबर : राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. याबाबत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘बँक घोटाळ्याप्रकरणी हायकोर्टाने गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले होते. यामध्ये सरकारचा काहीही संबंध नाही. सरकार सूडबुद्धीने अशा प्रकारची कारवाई करत नाही. महायुतीचा विधानसभा निवडणुकीत विजय होणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे. त्यामुळे ज्याला राजकारण कळतं ते सांगू शकेल की राज्य सरकार असं काही करणार नाही,’ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. दरम्यान, राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची बातमी आल्यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना शरद पवार यांनी या गुन्ह्याशी संबंध नाही, असं सांगितलं आहे. ED ने शरद पवारांवर गुन्हा नोंदवल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी (bank scam Money Laundering Case) शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवारांसह (Ajit Pawar) सर्व माजी संचालकांवर ED Enforcement Directorate ने गुन्हा दाखल केला. यासंदर्भात शरद पवार यांना विचारलं असता ते म्हणाले, “माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती नाही. बँकेकडून मला फोन आला, त्यात माझं नाव नसल्याची माहिती मला मिळाली.” राज्य शिखर बँकेच्या घोटाळ्यासंदर्भात बोलताना शरद पवार म्हणाले, “मी राज्य सहकारी बँकेशी संबंधित नव्हतो. मी कधीही बँकेचा संचालक नव्हतो. कुठल्याही बँकेच्या संचालक मंडळावर मी कधी नव्हतो. मी बँकेच्या निवडणुकीलासुद्धा कधी उभा राहिलो नव्हतो. ज्या संस्थेशी माझा कसलाही संबंध नाही, त्याच्यातल्या घोटाळ्यात मला गोवण्यात येत असेल तर काय बोलणार.” “या बँकेच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेशी माझा कधीही संबंध नव्हता. आता जी तक्रार दाखल करण्यात आली आहे, त्यात कर्ज देण्याच्या अनियमितपणाबद्दल तक्रार केली होती. कर्ज देण्याच्या प्रक्रियेशी माझा कसा संबंध? तरीही माझ्यावर केस करण्याविषयी निर्णय घेतला असेल तर धन्यवाद देतो. मी ज्या बँकेचा सभासदसुद्धा नाही. मग त्या बँकेच्या घोटाळ्याच्या गुन्ह्यात माझाही सहभाग कसा नोंदवला?” असा सवाल त्यांनी केला. VIDEO: पवारांवरील कारवाईनंतर बारामीतकरांमध्ये रोष, रस्त्यावर उतरून केली निदर्शनं

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात