मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

COVID-19: मुंबईतील 11 लाख घरं सील, 50 लाख लोकांना बाहेर पडण्यास मज्जाव

COVID-19: मुंबईतील 11 लाख घरं सील, 50 लाख लोकांना बाहेर पडण्यास मज्जाव

तर मुंबईच्या 4 विभागांमध्ये या दराने 300 दिवसांचा टप्पा गाठला आहे.

तर मुंबईच्या 4 विभागांमध्ये या दराने 300 दिवसांचा टप्पा गाठला आहे.

मुंबईतील झोपड्या आणि चाळीत सध्या सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह रुग्ण सापडले आहेत. 18957 रुग्ण या 798 झोपड्या आणि चाळीत सापडले आहेत तर 4538 इमारतीमध्ये आढळले आहेत.

मुंबई 11 जून:  महाराष्ट्रात मुंबईत कोरोनाचा सगळ्यात जास्त प्रकोप आहे त्यामुळे प्रशासन युद्ध पातळीवर काम करत आहे. कोरोनाग्रस्त रुग्ण जिथे सापडतो त्या इमारत आणि झोपडपट्टींना सील करण्यात येतं. अशी 11 लाखांपेक्षा जास्त घरं सील असून 50 लाखांपेक्षा जास्त लोकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मुंबईतील करोना बाधित रुग्णांनी 52 हजारांचा टप्पा कधीच उलटला आहे. सध्या मुंबईमध्ये 26 हजारांपेक्षा जास्त अक्टिव करोनाबाधित आहेत. म्हणजेच सध्या ज्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे अशा रुग्णांना अक्टिव्ह रुग्ण मानले जाते. हे अक्टिव्ह रुग्ण ज्या घरात सापडले आहेत त्या घरांना एपिसेन्टर मानत तिथला संसर्ग दुसरीकडे पसरू नये म्हणून त्या घरांना आणि भागांना कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केलं जातं. आणि काही काळापुरती ती घरं किंवा भाग सील केले जातात. म्हणजेच तिथून कुणालाही बाहेर जाण्यास आणि बाहेरून आत येण्यास लोकांना मज्जाव असतो. सध्या मुंबईमध्ये अशी 11 लाख 30 हजार 765 इतकी घरं आहेत. त्यापैकी झोपडपट्टीतील 9 लाख 50 हजार 578 तर इमारतींमधील 1 लाख 80 हजार 187 इतकी घर सील करण्यात आली आहेत. आणि मुंबईतील जवळपास अर्धा कोटी लोकांना सध्या घराबाहेर पडण्यास परवानगी नाही. या सील केलेल्या या घरांमध्ये राहणारी एकूण लोकसंख्या ही 50 लाख 20 हजार 538 इतकी येते याचा अर्थ असा की पन्नास लाखाहून अधिक लोकांना सध्या तरी कुठे ये जा करतां येणार नाही. कोरोनाची भीती: थुंकल्याचा जाब विचारल्याचा राग, मारहाणीत झाला ड्रायव्हरचा मृत्यू मुंबईतील झोपड्या आणि चाळीत सध्या सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह रुग्ण सापडले आहेत. 18957 रुग्ण या 798 झोपड्या आणि चाळीत सापडले आहेत तर 4538 इमारतीमध्ये 9956 असे एकूण 26 हजार 268 ॲक्टिव्ह रुग्ण सापडले आहेत. हे वाचा -  उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची पार पडली महत्त्वाची बैठक, या मुद्द्यांवर झाली चर्चा पुण्यात पालक आक्रमक, फी उकळणाऱ्या शाळांविरोधात ‘नो स्कूल नो फी’ आंदोलन संपादन - अजय कौटिकवार
Published by:Priyanka Gawde
First published:

पुढील बातम्या