कोरोनाची भीती: थुंकल्याचा जाब विचारल्याचा राग, मारहाणीत झाला ड्रायव्हरचा मृत्यू

कोरोनाची भीती: थुंकल्याचा जाब विचारल्याचा राग, मारहाणीत झाला ड्रायव्हरचा मृत्यू

दोघांमध्ये बाचाबाची झाली. या बोलाचालीचं पर्यवसन भांडणात झालं आणि भांणातून जोरदार हाणामारी झाली. त्या हाणामारीत गाडीच्या ड्रायव्हरचा मृत्यू झाला.

  • Share this:

नवी दिल्ली 11 जून: कोरोनाची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. व्हायरसचा प्रसार हा थुंकल्यामुळे किंवा तोंडातून निघणाऱ्या तुषारांवाटे सगळ्यात जास्त होतो हे आता सिद्ध झालं आहे. त्यामुळे तोंडावर मास्क लावा, थुंकू नका असं वारंवार सांगितलं जात आहे. मात्र अजुनही लोकांच्या सवयी जात नाहीत. राजधानी दिल्लीत गाडीचा ड्रायव्हर थुंकल्याने झालेल्या भांडणात ड्रायव्हरचा मृत्यू झाला.

दिल्लीतल्या थाना मंदिर मार्ग परिसरात एक गाडी थांबलेली होती. त्यावेळी तिथे काही तरुणही उपस्थित होते. गाडीचा ड्रायव्हर थुंकल्याने तिथे उभे असलेल्या एका इंजिनिअर तरुणाने त्याला समजविण्याचा प्रयत्न केला.

त्यातून त्या दोघांमध्ये बाचाबाची झाली. या बोलाचालीचं पर्यवसन भांडणात झालं आणि भांणातून जोरदार हाणामारी झाली. त्या हाणामारीत गाडीच्या ड्रायव्हरचा मृत्यू झाला.

ड्रायव्हरला जोरदार मार बसल्याने त्याचा श्वास कोंडला आणि त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा आरोप पोलिसांनी फेटाळून लावला आहे.

कोरोना संशयित म्हणून घरच्यांनी काढलं घराबाहेर, तापानं फणफणत रस्त्यावर होता भटकत

दरम्यान, देशात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात तब्बल 9996 नवीन रुग्ण आढळून आले. यासह कोरोनाबाधितांचा आकडा हा 2 लाख 86 हजार 579 झाला आहे. तर, दुसरीकडे आत मृतांचा आकड्यात सर्वात जास्त वाढ झाली. गेल्या 24 तासांत तब्बल 357 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह भारतातील एकूण मृतांचा आकडा 8 हजारांच्यावर गेला आहे. ही चिंतेची बाब असली तरी एक दिलासादायक बातमीही आली आहे.

आपल्याच गाडी खाली चिरडून वाहनचालकाचा मृत्यू, अपघात पाहून पोलिसही हादरले

भारतात आज सगळ्यात जास्त म्हणजे 357 रुग्णांचा मृत्यू झाला. याआधी 6 जून रोजी सगळ्यात जास्त 298 लोकांचा मृत्यू झाला होता. यासह भारतातील मृतांचा आकडा 8 हजार 102 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या सात दिवसांपासून रोज 9000 हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र असे असले तरी निरोगी रुग्णांची संख्या देशात वाढत आहे.

First published: June 11, 2020, 5:23 PM IST

ताज्या बातम्या