'योगा एट होम, योगा विद फॅमिली', यंदा साजरा होणार डिजिटल जागतिक योग दिन

'योगा एट होम, योगा विद फॅमिली', यंदा साजरा होणार डिजिटल जागतिक योग दिन

कोविड-19 अर्थात कोरोना व्हायरसच्या प्रार्श्वभूमीवर केंद्र सरकार यंदा जागतिक योग दिन 'डिजिटल' व्यासपीठावर साजरा करणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 6 जून: कोविड-19 अर्थात कोरोना व्हायरसच्या प्रार्श्वभूमीवर केंद्र सरकार यंदा जागतिक योग दिन 'डिजिटल' व्यासपीठावर साजरा करणार आहे. 'योगा एट होम, योगा विद फॅमिली' अशी यंदाची थीम असेल, असं केंद्रीय आयुष मंत्रालयाने याबाबत स्पष्ट केलं आहे.

जागतिक योग्य दिनाला लोक एकाच ठिकाणी जमू शकणार नाहीत. सोबतच योग दिनाच्या निमित्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लद्दाख येथे होणारा कार्यक्रम देखील रद्द करण्यात आला आहे.

हेही वाचा..कोरोना व्हायरसचा नायनाट करणारी लस लवकरच, 'या' फार्मा कंपनीनं केला करार

केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, येत्या 21 जून रोजी सकाळी 7 वाजता लोक डिजिटल प्लॅटफॉर्मवर योग दिनाच्या सोहळ्यात लोक सहभागी होऊ शकतील. जगभरातील भारतीय मिशन (दूतावास ) देखील या काळात डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे जोडल्या जातील. मंत्रालयाने यावर्षी लेहमध्ये योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आखली होती. जी कोरोना साथीच्या आजारामुळे रद्द करावी लागली.

पंतप्रधान मोदींनी 31 मे रोजी सुरू केलेल्या 'माय लाइफ, माय योगा' या व्हिडिओ ब्लॉगिंग स्पर्धेबरोबरच आयुष मंत्रालय आणि आयसीसीआर योगाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि लोकांना योग दिवसात सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्याची योजना आखत आहे. ही स्पर्धा दोन भागात विभागली जाईल. प्रथम, व्हिडिओ ब्लॉगिंगच्या विजेत्यांची निवड केली जाईल आणि दुसर्‍या क्रमांकावर या विजेत्यांना जागतिक विजेत्यांसह स्पर्धा करावी लागेल.

यासाठी, सहभागींनी तीन योग आसनाचा तीन मिनिटांचा व्हिडिओ पोस्ट करावा लागेल. तसेच, एका लहान व्हिडिओमध्ये, योगाने त्याच्या जीवनावर काय परिणाम होतो हे देखील सांगावे लागणार आहे. स्पर्धेच्या तीन श्रेणींमध्ये असून 18 वर्षाखालील तरुण, 18 वर्षांवरील प्रौढ आणि योग कर्त्यामध्ये होईल.

हेही वाचा.. भयंकर! हिमाचल प्रदेशात गर्भवती गाईला खाऊ घातला स्फोटकं टाकलेला गोळा

भारतीय विजेत्यांसाठी प्रथम पारितोषिक एक लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 50 हजार रुपये आणि तृतीय पारितोषिक 25 हजार रुपये असणार आहे.

First published: June 6, 2020, 8:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading