मराठी बातम्या /बातम्या /देश /

भयंकर! हिमाचल प्रदेशात गर्भवती गाईला खाऊ घातला स्फोटकं टाकलेला गोळा

भयंकर! हिमाचल प्रदेशात गर्भवती गाईला खाऊ घातला स्फोटकं टाकलेला गोळा

गाईच्या खाद्याचा गोळा बनवत त्यात स्फोटकं घालण्यात आली होती. नंतर ती गाईला खाऊ घालण्यात आली.

गाईच्या खाद्याचा गोळा बनवत त्यात स्फोटकं घालण्यात आली होती. नंतर ती गाईला खाऊ घालण्यात आली.

गाईच्या खाद्याचा गोळा बनवत त्यात स्फोटकं घालण्यात आली होती. नंतर ती गाईला खाऊ घालण्यात आली.

  • Published by:  Priyanka Gawde
नवी दिल्ली 6 जून: केरळमधल्या हत्तीणीची घटना ताजी असतानाच आता हिमाचल प्रदेशातही तशीच घटना घडली आहे. एका गर्भवती गाईला स्फोटकांनी भरलेला गोळा घाऊ घालण्यात आला. त्यानंतर ती गाय जखमी झाली. या घटनेने खळबळ उडाली असून आरोपीला पकडण्याची मागणी लोकांनी केली आहे. या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात असून आरोपीला कठोर शासन करा अशी मगणीही केली जात आहे. ‘आज तक’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. गाईच्या मालकाने याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर हे प्रकरण पुढे आलं आहे. गाईच्या खाद्याचा गोळा बनवत त्यात स्फोटकं घालण्यात आली होती. नंतर ती गाईला खाऊ घालण्यात आली. त्यात गाय गंभीर जखमी झाली आहे. केरळच्या प्रकरणावर देशभर संताप व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावरही यावर तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. केंद्र सरकारनेही त्याची दखल घेतली होती. दरम्यान केरळमधल्या हत्तीणीच्या हत्ये प्रकरणी 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून, इतरांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ताब्यात घेतलेल्या तिघांची कसून चौकशी केली जात आहे. गुरुवारी मानकरगड वन पथकाने याआधी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं होतं. मात्र आता आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे. मुख्य वन्यजीव वॉर्डन म्हणाले की, प्राथमिक पोस्टमॉर्टम अहवालानुसार फटाक्यांमुळे हत्तीणीच्या तोंडाला जखम झाल्याचे दिसून आले. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, केरळमधील मल्लापुरममध्ये हत्तीणीच्या हत्येबद्दल केंद्र सरकार गंभीर आहे. आम्ही योग्य चौकशी करुन दोषींना पकडण्यात कोणतीही कसर सोडणार नाही. हत्तींणीला फटाके खाऊन मारणे ही भारतीय संस्कृती नाही. (बातमीसाठी वापरलेला फोटो हा प्रातिनिधीक फोटो आहे.) हेही वाचा-  चीनच्या मुजोरीला भारताचं उत्तर, ड्रॅगनला सुनावले खडे बोल! जनतेमध्ये घबराट! कोरोनाची लक्षणं नसल्यास 24 तासांत रुग्णालयातून डिस्चार्ज
First published:

पुढील बातम्या