जयपूर, 16 ऑक्टोबर : देशात कोरोना लसीकरणाला (Corona vaccination) वेग आला आहे. जास्तीत जास्त लोकांना लस (Corona vaccine) देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. असं असताना देशातील काही नागरिक मात्र अद्यापही कोरोना लस घ्यायला तयार नाही. कुणी लस घ्यायलाच जात नाही, लसीकरण केंद्रापर्यंत जबरदस्ती नेलं तरी कितीतरी बहाणे करतात, लस द्यायला वैद्यकीय कर्मचारी घरी आले की कुणी आपल्या घरातच लपून बसतं किंवा कुणी काय काय कारणं देतं. पण राजस्थानमधील (Rajasthan) एका महिलेने तर हद्दच केली. तिने आपल्याला कोरोना लस देऊ नये म्हणून चक्क कोब्राच दाखवला (Women frightened medical team by cobra snake).
अजमेरमधील नागेलाव गावातील महिलेने कोरोना लस द्यायला आलेल्या वैद्यकीय टीमला सापाची भीती दाखवली. तिने आपल्याला कोरोना लस दिली तर तुमच्या अंगावर साप सोडेने, सापाला दंश करायला लावेन अशी धमकीच वैद्यकीय टीमला दिली.
डोर टू डोर लसीकरणासाठी वैद्यकीय टीम नागेलावमध्ये पोहोचली. तिथं राहणाऱ्या एका महिलेने कोरोना लस घेण्यास नकार दिला. कमलादेवी असं या महिलेचं नाव. ती गारूडी आहे. तिला कोरोना लस घ्यायची नव्हती. त्यामुळे वैद्यकीय टीम जेव्हा तिला कोरोना लस द्यायला गेली तेव्हा तिने आपल्या पेटाऱ्यात बंद असलेला साप बाहेर काढला आणि वैद्यकीय टीमला घाबरवू लागली.
हे वाचा - पालकांनो सावधान! कोरोनाबद्दल नवं संशोधन, लहान मुलांबाबत समोर आल्या या बाबी
महिला काही केल्या लस घ्यायला तयारच होत नव्हती. शेवटी वैद्यकीय टीमने गावातील इतर लोकांची मदत मागितली. सर्वांनी मिळून तिला समजावलं. कशीबशी करून तिची समजूत काढली. खूप वेळाच्या प्रयत्नानंतर ती लस घ्यायला तयार झाली. या ठिकाणी 20 जणांना कोरोना लस देण्यात आली.
विभागातील मुख्य वैद्यकीय अधिकारी घनश्याम मोयल यांनी सांगितलं, विभागाअंतर्गत शंभर टक्के कोरोना लसीकरणाचं लक्ष्य गाठण्यासाठी डोर टू डोर लसीकरण केलं जातं आहे. नागेलावच्या प्राथमि आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले डॉ. चारु झा यांच्या सूचनेनुसार वैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम नागेलावातील कालबेलियामध्ये पाठववणयात आली. तिथल्या गारूडी महिलेने खूप वेळानंतर लस घेतली.
हे वाचा - संसर्ग घटला तरी भारतात या लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका; संशोधनात मोठा खुलासा
भारत देशातील कोरोना व्हायरसचा नायनाट करण्यासाठी जगातील सर्वात मोठी लसीकरण (Vaccination) मोहीम राबवली जात आहे. त्यातच भारत देश लसीकरणाबाबत नवनवे विक्रमही मोडीत काढत आहे. आता आरोग्य मंत्रालयानं सेलिब्रेशनची तयारी सुरु केली आहे. कारण लवकरच देश 100 कोटी किंवा एक अब्ज लस डोस देण्याचा विक्रम करणार आहे.रिपोर्ट्सनुसार, पुढील आठवड्याच्या सुरुवातीपर्यंत हे लक्ष्य साध्य केलं जाणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय संपूर्ण भारतभर कार्यक्रमांसह हा दिवस साजरा करण्याची योजना आखत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Coronavirus, Rajasthan, Snake