नवी दिल्ली 16 ऑक्टोबर : आतापर्यंत कोरोना महामारीबद्दल (Covid 19 Pandemic) लोकांची अशी सामान्य धारणा आहे की त्याचा प्रसार लहान मुलांमधून (Coronavirus in Children's) कमी होतो. हेच कारण आहे की मुलांवर होणारा कोरोनाचा परिणाम जाणून घेण्यासाठी जगभर संशोधन केले जात आहे. आता एका नवीन संशोधनात असं समोर आलं आहे, की वृद्ध माणसांप्रमाणेच लहान मुलेदेखील कोरोना विषाणूचे वाहक (Carriers of Coronavirus) असू शकतात. अभ्यासातून समोर आलं की मुलं आणि प्रौढ सर्वच कोरोनाचे वाहक आहेत.
या संशोधनात यावर जोर देण्यात आला आहे की जर कोरोना महामारीला पराभूत करायचं असेल तर मुलांवर विशेष लक्ष द्यावे लागेल. हा अभ्यास मॅसेच्युसेट्स जनरल हॉस्पिटल, रॅगन युनिव्हर्सिटी, एमआयटी आणि हॉवर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या टीमने केला आहे. हा अभ्यास 2 आठवड्यांपासून 21 वर्षांच्या तरुणांसह 110 मुलांवर करण्यात आला. अभ्यासात सहभागी असलेल्या प्रत्येकाला कोरोना झाला होता.
सेलिब्रेशनची तयारी सुरू, पुढच्या आठवड्यात भारत देश करणार नवा विक्रम
या अभ्यासादरम्यान, संशोधकांना आढळलं की वयाचा साथीच्या प्रसाराशी काहीही संबंध नाही. म्हणजेच, संसर्ग झाल्यानंतर, एक लहान मूल देखील मोठ्या व्यक्तीप्रमाणे व्हायरस पसरवू शकतो. संशोधकांच्या टीमचा एक भाग असलेले डॉ. लायल योन्कर म्हणतात - मुले केवळ विषाणू पसरवू शकत नाहीत तर इतर लोकांना देखील संक्रमित करू शकतात.
या संशोधनात हेदेखील उघड झालं आहे, कोरोना मुलांमध्ये चिंतेचे कारण आहे. लक्षणे नसतानाही मुले कोरोनाचे वाहक बनू शकतात, तसेच कोरोनाचे नवीन व्हेरिएंट मुलांच्या शरीरात स्थान निर्माण करू शकतात. संशोधकांचं म्हणणं आहे की नवीन व्हेरिएंट मुलांमध्ये अधिक प्राणघातक ठरू शकतात. डेल्टा प्रकाराच्या बाबतीत हे दिसून आले आहे.
कोरोनाला रोखणारा फॉर्म्युला तयार; व्हायरस मानवी पेशीमध्ये एंट्रीच करू शकणार नाही
या अभ्यासाचा उद्देश लहान मुलांमध्ये कोरोना महामारीविषयी जागरूकता पसरवणे आहे. अभ्यासाद्वारे, कोरोना चाचणी आणि लहान मुलांमध्ये सामाजिक अंतर यासारख्या नियमांवर भर देण्यास सांगितलं गेलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona spread, Coronavirus