जाहिरात
मराठी बातम्या / देश / VIDEO: मफलर का घातला नाही? महिलेच्या प्रश्नावर केजरीवाल यांना आवरलं नाही हसू

VIDEO: मफलर का घातला नाही? महिलेच्या प्रश्नावर केजरीवाल यांना आवरलं नाही हसू

VIDEO: मफलर का घातला नाही? महिलेच्या प्रश्नावर केजरीवाल यांना आवरलं नाही हसू

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल एका महिलेची भेट घेत असताना तिने मफलरवरून केजरीवाल यांना प्रश्न विचारला. महिलेच्या या प्रश्नाने केजरीवाल यांना हसू आवरलं नाही.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

दिल्ली, 30 नोव्हेंबर: दिल्लीत MCD निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व्यग्र आहेत. यावेळी मंगळवारी प्रचार करत असताना मुख्यमंत्री केजरीवाल यांना एका महिलेनं त्यांनी मफलर का घातला नाही असा प्रश्न केला. यावर हसत हसत केजरीवाल यांनी अजून थंडी पडलेली नाही असं उत्तर दिलं. केजरीवाल यांचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुख्यमंत्री केजरीवाल हे आम आदमी पार्टीच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ लोकांच्या भेटीगाठी घेत होते. त्यावेळी दिल्लीतील लोकांनीसुद्धा केजरीवाल यांच्यासोबत सेल्फी काढले. तेव्हा केजरीवाल एका महिलेची भेट घेत असताना तिने मफलरवरून केजरीवाल यांना प्रश्न विचारला. महिलेच्या या प्रश्नाने केजरीवाल यांना हसू आवरलं नाही. महिलेच्या प्रश्नाला उत्तर देताना केजरीवाल म्हणाले की, अजून म्हणावी तेवढी थंडी पडलेली नाही त्यामुळे मफलर घातला नाही. आम आदमी पार्टीनेही हा व्हिडीओ शेअर केला आहे. हेही वाचा : जिथं गेला तिथं केलं लग्न! 4 राज्यात 6 संसार करणाऱ्याचं असं फुटलं भांडं

जाहिरात

मंगळवारी दिल्लीती तापमान 7.3 डीग्री सेल्सियस इतकं नोंदवलं गेलं. यंदाच्या हंगामातील हे सर्वात कमी तापमान आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार रविवारपर्यंत दिल्लीत थंडी वाढण्याची शक्यता आहे. तर पुढच्या आठवड्यात किमान तापमान 5 ते 6 डीग्रीपर्यंत पोहोचू शकते. बुधवारी दिल्ली एनसीआरमध्ये धुक्याची चादर पसरली होती आणि तापमान कमी असल्याने थंडी जाणवत होती. हेही वाचा :  पुतण्याच्या लग्नात डान्स करत होते काका अन् 5 सेकंदात झालं होत्याच नव्हत, LIVE VIDEO दिल्लीच्या नगर पालिका निवडणुकीसाठी ४ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर ७ डिसेंबरला मतमोजणी होणार असून त्यादिवशी निकाल लागेल. या निवडणुका एप्रिल महिन्यात होणार होत्या. मात्र तीन नगरपालिकांच्या एकीकरणाच्या निर्णयामुळे निवडणुकीला वेळ लागला. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी १४ नोव्हेंबर हा अखेरचा दिवस होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात