मराठी बातम्या /बातम्या /Viral /

जिथं गेला तिथं केलं लग्न! 4 राज्यात 6 संसार करणाऱ्याचं असं फुटलं भांडं

जिथं गेला तिथं केलं लग्न! 4 राज्यात 6 संसार करणाऱ्याचं असं फुटलं भांडं

एक, दोन नव्हे तर तब्बल सहा जणींशी संसार थाटणाऱ्या एका गायकाचा नुकताच भांडाफोड झाला आहे.

एक, दोन नव्हे तर तब्बल सहा जणींशी संसार थाटणाऱ्या एका गायकाचा नुकताच भांडाफोड झाला आहे.

एक, दोन नव्हे तर तब्बल सहा जणींशी संसार थाटणाऱ्या एका गायकाचा नुकताच भांडाफोड झाला आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 30 नोव्हेंबर :  अभिनेता अनिल कपूरचा ‘घरवाली बाहरवाली’ हा चित्रपट साधारणपणे 24 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. यात दोन पत्नींची मर्जी राखताना पतीला कशी तारेवरची कसरत करावी लागते हे दाखवलं होतं. सिनेमात असे प्रसंग पाहताना भरपूर मनोरंजन झालं होतं. खरोखरच्या आयुष्यातही अशी अनेक उदाहरणं पाहायला मिळतील. परंतु, एक, दोन नव्हे तर तब्बल सहा जणींशी संसार थाटणाऱ्या एका ऑर्केस्ट्रातील गायकाचा नुकताच भांडाफोड झाला आहे. त्याची चौकशी केली असता चार राज्यांतील सहा महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याने लग्न केल्याचं समोर आलं आहे. ‘टीव्ही नाईन हिंदी’नं या संदर्भात वृत्त दिलं आहे.

हिंदू विवाह कायद्यानुसार, एका व्यक्तीला एकदा लग्न करण्याचा अधिकार आहे. परंतु, असे असतानाही फसवणूक करून अनेकजण दोन जणींशी विवाह करतात. बिहारच्या जमुई जिल्ह्यात राहणाऱ्या 30 वर्षीय छोटू कुमारनं तर लग्न करण्याच्या बाबतीत सर्वांनाच मागं टाकलं आहे. एक, दोन नव्हे तर बंगाल, दिल्ली, झारखंड आणि बिहार अशा चार राज्यांतील सहा महिलांशी त्यानं लग्न केलं. या प्रत्येक पत्नीपासून त्याला मुलंही आहेत. ही बाब आजवर त्याने एकाही पत्नीला कळू दिली नव्हती. छोटू कुमार ऑर्केस्ट्रामध्ये गायक आहे.

जमुई रेल्वे स्थानकावर पहिल्या पत्नीसोबत प्रवास करत असताना दुसऱ्या पत्नीच्या भावाने त्याला पाहिलं होतं. त्यानंतर त्याने याची माहिती घरी दिली होती. कुटुंबीय रेल्व स्थानकावर पोहोचताच सर्व बाबींचा खुलासा झाला. छोटूने बंगाल, दिल्ली, झारखंड आणि बिहारमध्ये 6 लग्न केल्याचा आरोप दुसऱ्या पत्नीच्या आईने केला आहे.

पुतण्याच्या लग्नात डान्स करत होते काका अन् 5 सेकंदात झालं होत्याचं नव्हत, LIVE VIDEO

जिथं गेला तिथं लग्न

छोटू हा जमुई जिल्ह्यातील जवातरी गावातील रहिवासी आहे. तो  त्याच्या पहिल्या पत्नीबरोबर कोलकाताला जात होता. या वेळी माझ्या मुलाने त्याला पकडलं, असा आरोप दुसऱ्या पत्नीच्या आईने केला. छोटू ऑर्केस्ट्रामध्ये गाणी गाण्यास यायचा अन् तिथंच तरुणींना फसवून लग्न करायचा असं त्याच्या दुसऱ्या पत्नीनं म्हटलं. या प्रकारानंतर दुसऱ्या पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सध्या पोलिसांनी दोघांची समजूत काढून त्यांना परत पाठवलं आणि आपसांत भांडण मिटवण्याचा सल्ला दिला आहे.

2001 मध्ये पहिला विवाह

बरहट पोलीस ठाण्याच्या परिक्षेत्रातील जवातारी येथील रहिवासी गणेश दास यांचा मुलगा असलेल्या छोटू कुमार देवघर हा मां शारदा ऑर्केस्ट्रात गायक म्हणून काम करतो. त्याने 2001 मध्ये झारखंडमधील रांचीतील कलावती देवी नावाच्या महिलेशी विवाह केला होता. या दोघांना चार अपत्य आहेत. 2018 मध्ये त्याने लक्ष्मीपूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या सुंदरटांडमधील मंजूदेवीशी लग्न केलं. मंजू देवीलाही दोन अपत्य आहेत. मागील दीड वर्षांपासून छोटू  मंजूला भेटला नव्हता.

समुद्रात गर्लफ्रेंडला प्रपोज करायला गेला खरा पण, त्यानंतर जे घडलं ते... पाहा Video

दुसऱ्या पत्नीच्या भावाने छोटूला रेल्वे स्थानकावर पकडल्यानंतर त्याला व पहिली पत्नी कलावती या दोघांना पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. यानंतर कलावतीला याबाबत विचारलं असता, तिने पतीच्या आनंदातच माझं सुख आहे, असं उत्तर दिलं. विशेष म्हणजे, कलावतीला पतीच्या दुसऱ्या लग्नाबद्दल माहिती आहे. छोटूला सर्व सहा पत्नींपासून अपत्ये आहेत. प्रत्येक पत्नीसोबत तो एक ते दीड वर्षांपेक्षा अधिक काळ राहत नाही.

First published:

Tags: Marriage, Viral