मराठी बातम्या /बातम्या /देश /

खळबळजनक! छातीत वेदनेची समस्या घेऊन गेली आणि डॉक्टरांनी महिलेच्या भलत्याच जागेचं ऑपरेशन केलं

खळबळजनक! छातीत वेदनेची समस्या घेऊन गेली आणि डॉक्टरांनी महिलेच्या भलत्याच जागेचं ऑपरेशन केलं

महिलेसोबत रुग्णालयात घडला धक्कादायक प्रकार.

महिलेसोबत रुग्णालयात घडला धक्कादायक प्रकार.

महिलेसोबत रुग्णालयात घडला धक्कादायक प्रकार.

    जयपूर, 22 डिसेंबर : आपण आजारी पडलो की डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर आपल्या आजाराचं निदान करतात आणि योग्य ते उपचार सांगतात. डॉक्टरांवर विश्वास ठेवून आपण ते उपचार करतोही. पण काही डॉक्टर रुग्णांच्या याच विश्वासाचा गैरफायदा घेत असल्याचं दिसून आलं आहे. छातीत वेदना होत असल्याची तक्रार घेऊन आलेल्या महिलेला डॉक्टरानी ऑपरेशन करायला लावलं. त्यांनी ऑपरेशन केलं ते केलं तेसुद्धा भलत्याच जागेचं केलं. राजस्थानमधील हे धक्कादायक प्रकरण आहे (Woman with chest pain operated knee surgery). एका रुग्णालयात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. अजमेरमध्ये राहणाऱ्या 70 वर्षांच्या महिलेच्या छातीत वेदना होत होत्या, तिला श्वास घ्यायलाही त्रास होत होता. त्यामुळे ती 18 डिसेंबरला जयपूरच्या रजत हॉस्पिटलमार्फत आयोजित करण्यात आलेल्या एका कॅम्पमध्ये गेली. संध्याकाळी तिला उपचारासाठी जयपूरमध्ये आणलं. हे वाचा - कसं रोखणार Omicron ला? प्रसिद्ध मार्केटमधील गर्दीचा काळजात धस्सं करणारा VIDEO रुग्णालयाच तिच्याकडून विम्याच्या काही पेपर्सवर तिचा अंगठा गेण्यात आला आणि तिचं ऑपरेशन करण्यात आलं. श्वासासंबंधी आजाराचा उपचार करायला आलेल्या या महिलेच्या गुडघ्याचं ऑपरेशन केल्याचा आरोप हॉस्पिटलवर करण्यात आला आहे. महिलेला कारणाशिवाय आपल्या गुडघ्याचं ऑपरेशन केलं जाणार असल्याचं समजताच तिने ऑपरेशन करू नका म्हणत डॉक्टरांसमोर हात जोडले, रडली पण काहीच परिणम झाला नाही. तिच्या ऑपरेशनच्या नावाने चिरंजीवी विमा योजनेअंतर्गत मिळालेले पैसे हॉस्पिटलने हडप केले. हे वाचा - धक्कादायक! जन्माच्या 5 व्या दिवशी मुलीला आली मासिक पाळी झी न्यूज हिंदीच्या रिपोर्टनुसार या प्रकरणाबाबत जयपूरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी नरोत्तम शर्मा यांनी सांगितलं की, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी तीन डॉक्टरांची टीम बनवण्यात आली आहे. तर राज्याचे मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांनी रुग्णालयाविरोधात एफआयआर दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं सांगितलं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health, Lifestyle, Operation, Rajasthan, Surgery

    पुढील बातम्या