जाहिरात
मराठी बातम्या / Viral / धक्कादायक! जन्माच्या 5 व्या दिवशी मुलीला आली मासिक पाळी

धक्कादायक! जन्माच्या 5 व्या दिवशी मुलीला आली मासिक पाळी

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

चीनमध्ये राहणाऱ्या एका महिलेनं तिच्या 5 दिवसांच्या मुलीला (New Born baby) पिरियडस आले म्हणून रुग्णालयात दाखल केलं.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 22 डिसेंबर: मुली वयात येऊ लागताच त्यांच्या शरीरात (Body) अनेक बदल दिसून येतात. शारीरिक बदलांमध्ये मासिक पाळी अर्थात पिरियडस (Periods) येणं देखील समाविष्ट आहे. जेव्हा मुली पौगंडावस्थेत येतात तेव्हा मासिक पाळीचाही त्यात समावेश असतो. परंतु, चीनमध्ये (China) असाच एक प्रकार समोर आला की ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. चीनमध्ये राहणाऱ्या एका महिलेनं तिच्या 5 दिवसांच्या मुलीला (New Born baby) पिरियडस आले म्हणून रुग्णालयात दाखल केलं. होय, या महिलेची मुलगी केवळ 5 दिवसांची नवजात बालिका असून, तिला पिरियडस आल्याचं स्पष्ट झालं आहे. ही घटना 2019 मधील आहे. चीनमधील जहेजिआंग प्रांतातील एक महिला तिच्या 5 दिवसांच्या नवजात बालिकेला कुशीत घेऊन रुग्णालयात गेली. या महिलेच्या मुलीला पिरियड येत होते. जन्मानंतर केवळ पाच दिवसांतच मुलीला ब्लडिंग सुरू झाल्यानं ही महिला घाबरून गेली. ती तातडीने या नवजात मुलीला घेऊन रुग्णालयात पोहोचली. परंतु, रुग्णालयातील डॉक्टरांनी या नवजात बाळाची तपासणी केली असता, ही बाब नॉर्मल असून, घाबरण्याचं कारण नाही, असं सांगितलं. पाच दिवसांच्या नवजात मुलीला पिरीयडस येणं हे नॉर्मल कसं असू शकतं, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. कितने आदमी थे! शोलेतील प्रसिद्ध डायलॉगवर टीम इंडियाच्या ‘गब्बर’ चा अभिनय, VIDEO   चायना प्रेसनं याबाबतचं वृत्त प्रसिध्द केलं होतं. ही बाब नॉर्मल असल्याचं जेव्हा डॉक्टरांनी या मुलीच्या पालकांना सांगितलं तेव्हा ही बाब त्यांनाही पटली नाही. मात्र डॉक्टरांनी याबाबत अधिक स्पष्टीकरण देताना सांगितलं की याला निओनेटल मेंस्ट्रुएशन (Neonatal Menstruation) म्हणजेच नवजात मासिक पाळी असं म्हणतात. चीनमधील हांग्झोउमधील फर्स्ट रुग्णालयातील डॉ. वांग यांनी याबाबत सांगितलं की ``काही वेळा गर्भधारणेच्या शेवटच्या महिन्यांमध्ये भ्रुणाच्या शरीरात इस्ट्रोजेन ( Estrogen) जातं. हेच इस्ट्रोजेन रक्ताप्रमाणं बाळाच्या योनीतून बाहेर पडतं. ही बाब बहुतांश नवजात मुलींमध्ये दिसून येते``. ``जेव्हा हे इस्ट्रोजेन बाहेर पडतं, तेव्हा लोक याला पिरीयडस समजून घाबरून जातात. परंतु, हा प्रकार केवळ एका आठवड्यापर्यंत होतो. जेव्हा नवजात मुलीच्या शरीरातून इस्ट्रोजेन पूर्णपणे निघून जातं, तेव्हा ब्लडिंग बंद होतं. त्यामुळे जन्मानंतर नवजात मुलींच्या योनीतून रक्तस्त्राव झाला तर घाबरून जाण्याचं कारण नाही. ही अगदी नॉर्मल गोष्ट आहे. परंतु, बहुतांश पालकांना याबाबत माहिती नसते. त्यामुळे या कारणानं नवजात मुलीच्या जन्मानंतर तिच्या डायपर किंवा कपड्यांवर रक्ताचे डाग दिसल्यास पालक घाबरून जातात. परंतु, असं होणं एकदम नॉर्मल असतं, हे पालकांनी लक्षात घ्यावं``, असं डॉ. वांग यांनी सांगितलं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात