कराड यांच्या 'आशीर्वाद' यात्रेत पंकजा मुंडे सहभागी होणार? स्वतः कराड यांनीच दिले संकेत
कराड यांच्या 'आशीर्वाद' यात्रेत पंकजा मुंडे सहभागी होणार? स्वतः कराड यांनीच दिले संकेत
नवनिर्वाचित केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड जनआशीर्वाद यात्रा काढणार आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळात नव्यानं समावेश झालेल्या मंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आदेशानुसार आशीर्वाद यात्रा (Ashirwad Yatra) काढावी लागणार आहे.
नवी दिल्ली, 14 ऑगस्ट: काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. यामध्ये पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याकडे कोणतीही जबाबदारी न दिल्यानं महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. पण पंकजा मुंडे यांनी स्वतः या प्रकरणावर स्पष्टीकरण देऊन वादावर पडदा टाकला होता. त्यानंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळात नव्यानं समावेश झालेल्या मंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आदेशानुसार आशीर्वाद यात्रा (Ashirwad Yatra) काढावी लागणार आहे.
याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) हेही जनआशीर्वाद यात्रा काढणार आहेत. ही यात्रा कराड यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरणार आहे. यात्रेची सुरुवात करण्यापूर्वी कराड हे पंकजा मुंडे यांच्या घरी जाणार आहेत. त्यानंतर गोपीनाथगडावरून या आशीर्वाद यात्रेला प्रारंभ होणार असल्याची माहिती कराड यांनी स्वतः दिली आहे. दुसरीकडे, नारायण राणे, डॉ. भारती पवार आणि कपिल पाटील यांचीही आशीर्वाद यात्रा निघणार आहे.
हेही वाचा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रवीण दरेकर यांच्यात बंद दाराआड चर्चा
खरंतर, कराड यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानं महाराष्ट्रातील राजकारण तापलं होतं. कराड यांच्या निवडीनं पंकजा मुंडे नाराज असल्याचं चित्र होतं. मात्र पंकजा यांनीच या मुद्द्यांवर स्पष्टीकरण देत वादावर पडदा टाकला होता. यानंतर आता कराड यांची जनआशीर्वाद यात्रा निघणार आहे. तत्पूर्वी ते पंकजा मुंडे यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर गोपीनाथगडावरून आशीर्वाद यात्रेची सुरुवात होणार असल्याचं कराड यांनी सांगितलं आहे. ते शुक्रवारी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना याबद्दल सांगितलं आहे.
हेही वाचा-...नाहीतर ED ची चौकशी मागे लावू; मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांना धमकीचा मेसेज
या जनआशीर्वाद यात्रेत पंकजा मुंडे देखील सहभागी होणार असल्याचे संकेत कराड यांनी दिले आहेत. नवनिर्वाचित मंत्र्यांना आशीर्वाद यात्रेत पाच लोकसभा मतदारसंघात जाण्यास सांगितलं आहे. या यात्रेच्या निमित्तानं संबंधित मतदार संघात जाऊन केंद्र सरकारकडून सुरू असणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला जाणार आहे. औरंगाबाद येथे या यात्रेचा समारोप करण्यात येणार आहे, अशी माहितीही कराड यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.