मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

BREAKING : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांच्यात बंद दाराआड चर्चा, राजकीय चर्चांना उधाण

BREAKING : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांच्यात बंद दाराआड चर्चा, राजकीय चर्चांना उधाण

देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय प्रवीण दरेकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात काय चर्चा झाली याची राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय प्रवीण दरेकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात काय चर्चा झाली याची राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय प्रवीण दरेकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात काय चर्चा झाली याची राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

  • Published by:  sachin Salve
मुंबई, 13 ऑगस्ट : दिल्लीवारी करून परतलेले भाजपचे नेते आता राज्यात कामाला लागले आहे. आज मुंबईत भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (praveen darekar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आज मार्मिक वर्धापन दिन सोहळा मुंबईत पार पडत आहे.  राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडत आहे. या कार्यक्रमाला प्रवीण दरेकर यांनी हजेरी लावली. यावेळी दरेकर यांच्या मार्फत पूरग्रस्त भागांसाठी दीड कोटींची मदत देण्यात आली आहे. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. सुमारे 15 ते 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती, न्यूज १८ लोकमतला विश्वसनीय सूत्रांनी दिली. विराटसोबत तुलना पण यश नाही, अखेर भारतीय क्रिकेटपटूने घेतली निवृत्ती देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय प्रवीण दरेकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात काय चर्चा झाली याची राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, 30 जुलै रोजी अतिवृष्टीमुळे महापूर आलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत होते त्याच वेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर हे सुद्धा पूरग्रस्त भागाचा दौऱ्यावर होते. याच दरम्यान आजी-माजी मुख्यमंत्री हे कोल्हापुरात एकमेकांच्या समोरासमोर आले होते. आर्मी ऑफिसर असल्याचं सांगत करायचा ऑनलाईन चॅटिंग; अनेक तरुणींना गळाला लावलं कोल्हापुरात विरोधी पक्षनेते दौऱ्यावर होते ज्यावेळी चिखली, आंबेवाडी या दोन गावांना विरोधी पक्षनेत्यांनी भेटी दिल्या त्यानंतर उत्तरेश्वर पेठेतील पूर परिस्थितीची पाहणी करून ते शाहूपुरी सहावी गल्लीमध्ये येणार होते आणि झालही तसंच देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते शाहूपुरी गल्लीत बरोबर 12 वाजता दाखल झाले आणि त्यावेळी त्यांनी पूरग्रस्तांची चर्चाही सुरू केली. त्यावेळी मुख्य रस्त्यापासून जवळपास 50 मीटर अंतरावर भाजपचे नेते पोहोचले होते. त्याच वेळी थेट शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी मधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाहनांचा ताफा कुंभार गल्लीच्या त्याच जागेवर 12 वाजून 14 मिनिटांनी आला. जिथं फडणवीस यांच्या गाडीचा ताफा लागला होता आणि मग काय ही नक्कीच राजकीय वर्तुळातील मोठी बातमी ठरली. नेमक्या त्याच वेळी फडणवीस आणि भाजपचे इतर नेते या गल्लीमधून मुख्य रस्त्याकडे येत होते आणि उद्धव ठाकरे हे पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गल्लीमध्ये पुढे जात होते. त्यावेळी या दोन्ही नेत्यांची समोरासमोर भेट झाली सुरुवातीला मिलिंद नार्वेकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ गेले त्यांनी फडणवीस यांच्याशी काहीतरी बोलणं केलं आणि मग फडणवीस आणि नार्वेकर एकत्रपणे उद्धव ठाकरे यांच्या जवळ आले होते. या यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली होती.
First published:

पुढील बातम्या