Home /News /mumbai /

...नाहीतर ED अन् CBI चौकशी मागे लावू; मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकरांना धमकी

...नाहीतर ED अन् CBI चौकशी मागे लावू; मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकरांना धमकी

व्हॉट्सअपवर अनोळखी नंबरवरुन मिलिंद नार्वेकर यांना मिळालेल्या या धमकीत (Threatening Whatsapp Message to Milind Narvekar) अज्ञात व्यक्तीनं काही मागण्या केल्या आहेत

    मुंबई 14 ऑगस्ट : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे स्वीय्य सहाय्यक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना धमकी मिळाली आहे. अज्ञात व्यक्तीकडून व्हॉट्सअपवर ( Whatsapp Message) मिळालेल्या या धमकीमुळे एकच खळबळ उडाली आहे. व्हॉट्सअपवर अनोळखी नंबरवरुन मिळालेल्या या धमकीत (Threatening Whatsapp Message to Milind Narvekar) अज्ञात व्यक्तीनं काही मागण्या केल्या आहेत.. मागण्या मान्य केल्या नाही तर ED, CBI किंवा NIA ची चौकशी मागे लावू अशी धमकी यात देण्यात आली आहे. LIVE: उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीत, कोरोना परिस्थितीचा घेणार आढावा हा धमकीचा मेसेज आल्यानंतर नार्वेकर यांनी याबाबत मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी मेसेजमधील मजकुराचाही उल्लेख केला आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांना टार्गेट केलं जात असल्याची तक्रारदेखील केली आहे. मिलिंद नार्वेकर यांच्याकडे आरोपींनी नेमकी कोणती मागणी केली, याचे तपशील अद्याप उघड झालेले नाहीत. मात्र, यातील मागण्या मान्य न केल्यास ED, CBI किंवा NIA ची चौकशी मागे लावू अशी धमकी यात दिली गेली आहे. विमानप्रवास महागणार; देशांतर्गत विमान तिकीट दर वाढवण्याचा सरकारचा निर्णय मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आहेत. काही दिवसांपूर्वीच अतिरिक्त मुख्य सचिवांना शरद पवारांच्या नावे बदली करता धमकी देण्यात आली होती. ते प्रकरण ताजे असतानाच आता मिलिंद नार्वेकर यांना धमकी देण्यात आलीये. या प्रकरणात आता पुढे नेमकी काय पावले उचलली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: CBI, Uddhav thackeray

    पुढील बातम्या