नवी दिल्ली, 11 सप्टेंबर : 'छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून आम्हाला प्रेरणा मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला गोष्ट शिकवली आहे, दिल्ली समोर झुकणार नाही, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (shard pawar) यांनी मोदी सरकारविरोधात लढण्याचा कानमंत्र दिला.
नवी दिल्लीत राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारणी मेळावा पार पडला. यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत भाजपवर टीकास्त्र सोडले.
गेल्या काही वर्षात देशात मोठे बदलाव आले आहेत. शेतकरी देशाच्या अन्नाची गरज पूर्ण करते. देशाला शेतकऱ्यावर गौरव आहे. पण शेतकऱ्यांच्या दुखत आत्महत्या होत आहे. आपल्या देशात 56 टक्के लोक शेतीवर अवलंबून आहे आम्हाला आमच्या शेतकऱ्यांवर गर्व आहे. सध्याच्या केंद्र सरकारच्या विरोधात मोठा रोष आहे. शेतकऱ्याच्या हितासाठी एकत्रितपणे लढण्याची आवश्यकता आहे, असंही शरद पवार म्हणाले.
देशात अल्पसंख्यक समाजाबद्दल विरोधाचे वातावरण तयार केले जात आहे. संसदेत तीन कृषी कायद्यांवर संसदेत चर्चा करण्यात आली नाही जगाने दिल्लीच्या सीमेवर शांततेत सुरू होतं. राष्ट्रवादी कॉंग्रेस शेतकऱ्यांचा पाठीशी उभा राहणारा पक्ष आहे. ज्या ज्या वेळी शेतकऱ्यांच्या अडचणी येतील, त्या त्यावेळी राष्ट्रवादी लढण्यासाठी मैदानात उतरेल, असंही पवार म्हणाले.
(कोर्टात वाद आणि मुख्यमंत्री थेट सरन्यायाधीशांसोबत एकाच व्यासपीठावर, जयंत पाटील म्हणाले...)
१५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून महिलांच्या आदराविषयी भाषण केलं. एकीकडे महिलांच्या सन्मानाच्या गोष्टी करायच्या, अन् दुसरीकडे आपल्या गुजरात राज्यात बिलकीस बानो हिच्यावर अत्याचार करणारे, तिच्या कुटुंबातील सदस्यांची हत्या करणाऱ्या लोकांची शिक्षा माफ करण्याचं काम गुजरात सरकारने केलं, अशी टीकाही पवार यांनी केली.
(पृथ्वीराज चव्हाणांच्या मनात चाललंय काय? काँग्रेसचे कार्यकर्तेही गोंधळले)
'देशात महागाई वाढली असता. भाजपचे नेते देश पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाल्याचा दावा करतात पण इंग्लंडला मागे ढकल्याचा दावा करतात मात्र भारताचे दरडोई उत्पन्न इंग्लंडच्या तुलनेत फार कमी आहे, अशी टीकाही पवारांनी केली.
'भारत आणि चीन सीमेवरील पेट्रोलिंग पॉइंटवर चीनने नियंत्रण मिळवलं आहे. आपल्या देशात कोणी घुसलं नाही असं देशांच्या पंतप्रधानांना सांगितलं मात्र, पंतप्रधानांना देशाला घुमजाव केलं. एप्रिल २०२० ला जशी स्थिती सध्या सीमेवर नाही' असंही पवार म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.