सातारा, 11 सप्टेंबर : काँग्रेसचे दोन माजी मुख्यमंत्री सध्या चांगलेच चर्चेत आहे. अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. तर पृथ्वीराज चव्हाण पक्षाविरोधातच निर्णय घेण्याच्या भूमिकेत आहे. अशातच कराडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात पृथ्वीराज चव्हाण ( Prithviraj Chavan) यांनी नेत्यांचे फोटोच बॅनरवर लावले नाही. त्यामुळे कार्यकर्ते चांगलेच बुचकळ्यात पडले. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर केलेल्या विधानामुळे राज्यभरात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यातच पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड शहरात घेतलेल्या एका कार्यक्रमात फ्लेक्सवर कोणत्याही काँग्रेस नेत्याचे फोटो अथवा चिन्ह न गाायब आहे. फक्त पृथ्वीराज चव्हाण यांचाच फोटो फ्लेक्सवर झळकला आहे. काँग्रेस नेत्यांचे फोटो न दिसल्याने सोशल मीडियावर पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस सोडणार अशी चर्चा देखील आता रंगू लागली आहे. गेली चार दशके गांधी घराण्याची एकनिष्ठ असलेले चव्हाण कुटुंबीय काँग्रेस पक्ष सोडून इतर पक्षात जातील अशी परिस्थिती नाही मात्र पृथ्वीराज चव्हाण यांच्या या भूमिकेमुळे सामान्य काँग्रेस कार्यकर्ता मात्र संभ्रमात पडला आहे. आधीच पृथ्वीराज चव्हाण मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याच्या उलट सुलट चर्चा सध्या सुरू आहेत. येत्या 22 सप्टेंबरला काँगेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसमध्येच राहून अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार की गांधी घराण्याचे विरोधात भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (कोर्टात वाद आणि मुख्यमंत्री थेट सरन्यायाधीशांसोबत एकाच व्यासपीठावर, जयंत पाटील म्हणाले…) दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पृथ्वीराज चव्हाण यांनीही काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदार यादी सार्वजनिक करण्याची मागणी केली. काँग्रेसच्या असंतुष्ट ज्येष्ठ नेत्यांच्या गटातील जी-23 चे सदस्य मानले जाणारे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, काँग्रेस अध्यक्षांना निवडणुकीसाठी मतदार याद्या सार्वजनिक करण्याच्या सूचना द्याव्यात. (उदय सामंत जरा जास्तच ढवळाढवळ करतात विनायक राऊतांनी सामंतांचा घेतला समाचार) पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, प्रत्येक निवडणुकीत मतदार यादी जाहीर केली जाते. त्यामुळे मतदार यादी संकेतस्थळावर टाकून मतदारांना ईमेलद्वारे मतदार यादी देण्यात यावी. वेबसाईटमध्ये काही अडचण असल्यास ती ईमेल करावी. निवडणुकीची पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी आणि काँग्रेसवरील सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विश्वास पुनर्संचयित करण्यासाठी काँग्रेस अध्यक्षांनी मतदार यादी सार्वजनिक करण्याचे किंवा इच्छुक उमेदवाराला ई-मेल करण्याचे निर्देश द्यावेत. विशेष म्हणजे काँग्रेस खासदार मनीष तिवारी, शशी थरूर, कार्ती चिदंबरम यांनी यापूर्वीच मतदार यादी सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. तर काँग्रेसचा राजीनामा देणारे गुलाम नबी आझाद यांनीही काँग्रेस सदस्यत्व आणि अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.