• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • BREAKING : हायकोर्टात का गेला नाहीत? सुप्रीम कोर्टाने परमबीर सिंग यांना फटकारले

BREAKING : हायकोर्टात का गेला नाहीत? सुप्रीम कोर्टाने परमबीर सिंग यांना फटकारले

'परमबीर सिंग यांनी केले आरोप हे गंभीर आहे पण हायकोर्टात याबद्दल याचिका दाखल का केली नाही'

 • Share this:
  नवी दिल्ली, 24 मार्च : मुंबईचे (Mumbai) माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने (supreme court)या प्रकरणात तुम्ही हायकोर्टामध्ये का गेला नाही? असा सवाल विचारत फटकारून काढले आहे. परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती संजीव रेड्डी आणि न्यायमूर्ती कौल या द्विसदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी झाली.

  तो अहवाल लवंगी फटका की बॉम्ब लवकरच कळेल, फडणवीसांचा राऊतांवर पलटवार

  न्यायमूर्तींनी परमबीर सिंग यांचे वकील मुकुल रोहितगी यांना विचारले की 'तुम्ही गृह विभागाला संबंधित पक्ष का बनविला नाही? आपण अनुच्छेद 32 अंतर्गत याचिका का दाखल केली, 226 वर का गेला नाहीत? असे थेट सवाल उपस्थितीत केले. तसंच, न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती आर. सुभाष रेड्डी यांच्या खंडपीठाने ज्यांवर तुम्ही आरोप केले आहे, ते अनिल देशमुख यांना पक्ष का बनवले नाही, असा सवाल केला आणि आपण प्रथम उच्च न्यायालयात का गेला नाही? असेही विचारले. इनिंगच्या शेवटी धावांचा पाऊस; मिडल ओव्हरमध्ये विकेट्स, भारताच्या विजयाची 5 कारणं परमबीर सिंग यांनी केले आरोप हे गंभीर आहे पण हायकोर्टात याबद्दल याचिका दाखल का केली नाही. हायकोर्टाला चौकशी समिती स्थापन करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे हायकोर्टामध्ये याचिका दाखल करा, अशी सूचना न्यायमूर्ती यांनी दिली आहे. मुंबईत स्फोटकांनी गाडी सापडल्या प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली होती. त्यामुळे दुखावलेल्या परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करत पत्र लिहिले होते. त्यांच्या पत्राची दखल घेत नसल्याचे लक्षात आल्यावर परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर 26 मार्च रोजी सुनावणी होणार होती. पण, याचिकेवर लवकर सुनावणी घ्यावी अशी विनंती करण्यात आली. त्यानंतर आज ही सुनावणी पार पडली. परमबीर सिंग यांनी काय केले आरोप? 20 मार्च रोजी परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत खळबळ उडवून दिली होती. या पत्रातून परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे याला दर महिन्याला मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून 100 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते, असा गौप्यस्फोट परमवीर सिंह यांनी केला आहे. अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला आपल्या निवास्थानी बोलावून वसुली करण्याचे सांगितले होते, असंही परमबीर यांनी पत्रात उल्लेख केला आहे.
  Published by:sachin Salve
  First published: