मराठी बातम्या /बातम्या /देश /

अमरनाथ घटनेत आतापर्यंत 16 भाविकांचा मृत्यू; डोंगराळ भागातच का होते ढगफुटी? वाचा कारण

अमरनाथ घटनेत आतापर्यंत 16 भाविकांचा मृत्यू; डोंगराळ भागातच का होते ढगफुटी? वाचा कारण

ढग प्रवास करत असताना वातावरणात अचानक गरम हवेचा थर तयार झाल्यास ढगफुटी होते. मुंबईमधली ढगफुटी यामुळेच झाली होती.

ढग प्रवास करत असताना वातावरणात अचानक गरम हवेचा थर तयार झाल्यास ढगफुटी होते. मुंबईमधली ढगफुटी यामुळेच झाली होती.

ढग प्रवास करत असताना वातावरणात अचानक गरम हवेचा थर तयार झाल्यास ढगफुटी होते. मुंबईमधली ढगफुटी यामुळेच झाली होती.

मुंबई 09 जुलै : काही दिवसांपूर्वीच मोठ्या उत्साहात अमरनाथ यात्रेची (Amarnath Yatra) सुरुवात झाली होती. कोरोनामुळे यंदा सुमारे दोन वर्षांनंतर ही यात्रा पार पडत आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक या यात्रेला उपस्थित राहत आहेत; मात्र शुक्रवारी (8 जुलै) संध्याकाळच्या सुमारास अमरनाथ गुहेजवळ (Amarnath Cave) मोठी ढगफुटी (Amarnath Cloudburst) झाल्याने या यात्रेला गालबोट लागलं. ढगफुटीमुळे झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 16 भाविकांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ढगफुटीची (Amarnath Cloudburst information) माहिती कळल्यानंतर एनडीआरएफने (NDRF) तात्काळ बचावकार्यास सुरुवात केली होती. यापूर्वीही कित्येक वेळा देशात ढगफुटीमुळे मोठी आपत्ती आली आहे. त्यातल्या बहुतांश घटना डोंगराळ भागात झाल्या आहेत. डोंगराळ भागातच ढगफुटीच्या (Cloudburst in Mountains) घटना वारंवार का घडतात, यामागे काय कारण आहे, ते जाणून घेऊ या. 'आज तक'ने याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. Amarnath Cloudburst : अमरनाथ ढगफुटीत पुण्यातील तिघे बेपत्ता, प्रशासनाकडून शोध सुरू ढगफुटी कशामुळे होते? ढगफुटीवेळी पडणाऱ्या पावसाचं स्वरूप नेहमीच्या पावसापेक्षा अगदी भयंकर असतं. भरपूर पाण्याचे कण असलेले बरेच ढग एकाच ठिकाणी जमा झाल्यास ते एकत्र होतात. यामुळे ढगांमधले पाण्याचे कण एकत्र होऊन त्यांचा भार वाढतो. हा भार अगदीच जास्त झाल्यास एकदमच सगळं पाणी बाहेर पडतं. यामुळेच त्याला ढगफुटी झाली (How does cloudburst happen) असं म्हणतात. उदाहरण द्यायचं झाल्यास, पाण्याने भरलेला एखादा फुगा फोडल्यास त्यातून एकाच वेळी जसं भरपूर पाणी बाहेर पडतं, अगदी तशाच पद्धतीचा पाऊस ढगफुटीवेळी पडतो. या ढगांना ‘प्रेग्नंट क्लाउड’ (Pregnant cloud) असंही म्हटलं जातं. डोंगराळ भागात का होतात या घटना? ढग जेव्हा हवेतून प्रवास करत असतात, तेव्हा डोंगरांमुळे त्यांची वाट अडवली जाते. अशा वेळी एकाच ठिकाणी भरपूर ढग जमा होतात. सोप्या शब्दांमध्ये सांगायचं झाल्यास, डोंगरामुळे वाट अडवली जाऊन त्या ठिकाणी ढगांचं ट्रॅफिक जॅम होतं. हे ढग मग एकत्र जमा होऊन ढगफुटीसारख्या घटना घडतात. डोंगरावर (Cloudburst in Mountains) अचानक भरपूर पाऊस पडल्यामुळे ते पाणी प्रचंड वेगाने खाली येऊ लागतं. खाली येताना ते वाटेत येणारे खडक, माती, चिखल आणि छोटी झाडंदेखील आपल्यासोबत घेऊन येतं. या पाण्याचा वेग आणि ताकद एवढी असते, की वाटेतली प्रत्येक गोष्ट ते नष्ट करू शकतं. डोंगराळ भागात सुमारे 15 किलोमीटर उंचीवर ढगफुटी होते, तेव्हा काही सेकंदांमध्येच दोन सेंटिमीटरहून अधिक पाऊस पडतो. अर्थात, ढगफुटीचा परिसर हा एक वर्ग किलोमीटरपेक्षा मोठा नसतो. त्यामुळे याची तीव्रता अधिक असते. कारण अगदी कमी भागात एकाच वेळी भरपूर पाणी पडतं; मात्र याचा अर्थ असा नाही की केवळ डोंगराळ भागातच ढगफुटी होते. समतल जमिनीवरही ढगफुटी होण्याची शक्यता असते. 26 जुलै 2005 ला मुंबईमध्ये आलेल्या महापुराचं (Mumbai Floods) कारण ढगफुटी हेच होतं. ढग प्रवास करत असताना वातावरणात अचानक गरम हवेचा थर तयार झाल्यास ढगफुटी होते. मुंबईमधली ढगफुटी यामुळेच झाली होती. Amarnath Cloudburst: अमरनाथ घटनेवर अक्षय कुमारने व्यक्त केलं दुःख; हात जोडून केली ही प्रार्थना ढगफुटीच्या आतापर्यंतच्या काही गंभीर घटना 24 ऑगस्ट 1906 - अमेरिकेतल्या व्हर्जिनिया राज्यातल्या गिनी शहरात तब्बल 40 मिनिटं ढगफुटी झाली. त्या कालावधीत त्या परिसरात 9.25 इंच पावसाची नोंद झाली. 29 नोव्हेंबर 1911 - पनामाच्या पोर्ट वेल्समध्ये ढगफुटी झाल्यामुळे पाच मिनिटांत 2.43 इंच पावसाची नोंद झाली. 12 मे 1916 - जमैकामधल्या प्लम्ब पॉइंटमध्ये ढगफुटी झाल्यामुळे 15 मिनिटांत 7.8 इंच पावसाची नोंद झाली होती. 7 जुलै 1947 - रोमानियाच्या कर्टी-दे-आर्गस शहरात ढगफुटी झाल्यामुळे 20 मिनिटांत 8.1 इंच पाऊस झाला होता. 26 नोव्हेंबर 1970 - हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटी झाल्यामुळे अवघ्या एका मिनिटात 1.5 इंच पावसाची नोंद झाली. 6 ऑगस्ट 2010 - लेहमध्ये ढगफुटी झाल्यामुळे एकाच मिनिटात 1.9 इंच पावसाची नोंद झाली होती. 16-17 जून 2013 - केदारनाथमध्ये ढगफुटीच्या घडना घडल्या होत्या. 10 ते 15 मिनिटांमध्ये प्रचंड पाऊस आणि भूस्खलन झालं होतं. या भीषण दुर्घटनेत सुमारे 5 हजार नागरिकांचा मृत्यू झाला होता. 11 मे 2016 - शिमल्याजवळ सुन्नी शहरात ढगफुटी होऊन प्रचंड नुकसान झालं होतं. 14 ऑगस्ट 2017 - पिथोरागढ जिल्ह्यात मांगती नाल्याजवळ ढगफुटी झाल्यामुळे चार नागरिकांचा मृत्यू झाला होता. तसंच कित्येक जण बेपत्ता झाले होते. दरम्यान, शुक्रवारी (8 जुलै) अमरनाथमध्ये झालेल्या ढगफुटीनंतर बचावकार्य वेगाने सुरू करण्यात आलं आहे. केंद्र सरकारने तातडीने या दुर्घटनेची दखल घेतली असून मदत पाठवली आहे. तसंच, तिथे अडकलेल्या व्यक्तींसाठी हेल्पलाइन नंबर (Amarnath cloudburst helpline) जारी करण्यात आले आहेत.
First published:

Tags: Jammu kashmir, Rain

पुढील बातम्या