जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Amarnath Cloudburst: अमरनाथ घटनेवर अक्षय कुमारने व्यक्त केलं दुःख; हात जोडून केली ही प्रार्थना

Amarnath Cloudburst: अमरनाथ घटनेवर अक्षय कुमारने व्यक्त केलं दुःख; हात जोडून केली ही प्रार्थना

Akshay Kumar

Akshay Kumar

जम्मू-काश्मीरमधील अमरनाथ गुहेच्या (Amarnath Cave) काही किलोमीटर अंतरावर शुक्रवारी संध्याकाळी अचानक झालेल्या ढगफुटीमध्ये (Amarnath cave cloudburst) अनेकांचा मृत्यू झाला असून अनेक लोक अद्याप बेपत्ता आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 9 जुलै-  जम्मू-काश्मीरमधील अमरनाथ गुहेच्या (Amarnath Cave) काही किलोमीटर अंतरावर शुक्रवारी संध्याकाळी अचानक झालेल्या ढगफुटीमध्ये (Amarnath cave cloudburst) अनेकांचा मृत्यू झाला असून अनेक लोक अद्याप बेपत्ता आहेत. भारतीय लष्कराच्या नेतृत्वाखाली NDRF, SDRF आणि ITBP च्या टीम बचावकार्यात उतरल्या आहेत. या घटनेवर शोक व्यक्त करत बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने (Akshay Kumar) ट्विट करत याठिकाणी अडकलेल्या भाविकांसाठी प्रार्थना केली आहे.अचानक घडलेल्या या घटनेने लोक अस्वस्थ झाले आहेत. अमरनाथमधील या दुःखद घटनेनंतर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करत दुःख व्यक्त केलं आहे. अभिनेत्याने ट्विट करत लिहलंय, ‘बालटालमध्ये अमरनाथ मंदिरातील पवित्र गुहेजवळ ढगफुटीनंतर झालेल्या जीवितहानीमुळे खूप दुःख झालं. सर्वांच्या शांती आणि सुरक्षिततेसाठी प्रार्थना’.

जाहिरात

अमरनाथ यात्रेसाठी दरवर्षी IMD हवामानाबाबत विशेष सूचना जारी करते. शुक्रवारी IMD ने यलो अलर्ट जारी केला होता. अमरनाथ यात्रेच्या वेबसाइटवर संध्याकाळी 4.07 पर्यंत हवामान अंदाजानुसार, पहलगाम आणि बालटाल या दोन्ही बाजूच्या मार्गांसाठी “अंशत: ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाचा” अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र अचानक झालेल्या ढगफुटीने लोक हादरून गेले आहेत. (हे वाचा: Amarnath Cloudburst : आळंदीचे 50 भाविक ढगफुटीत अडकले, एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू ) बीएसएफ काश्मीर मुख्यालयातून मृतदेह श्रीनगरमधील पोलीस मुख्यालयात नेले जात आहेत. घटनास्थळावरून आतापर्यंत 16 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बचावकार्य अजूनही सुरू आहे. 40 जण अजूनही बेपत्ता असून 64 जण जखमी असल्याचं समोर येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात