मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Amarnath Cloudburst : अमरनाथ ढगफुटीत पुण्यातील तिघे बेपत्ता, प्रशासनाकडून शोध सुरू

Amarnath Cloudburst : अमरनाथ ढगफुटीत पुण्यातील तिघे बेपत्ता, प्रशासनाकडून शोध सुरू

ढगफुटीची घटना पवित्र गुहेजवळील एक ते दोन किमीच्या अंतरावर घडली.

ढगफुटीची घटना पवित्र गुहेजवळील एक ते दोन किमीच्या अंतरावर घडली.

ढगफुटीची घटना पवित्र गुहेजवळील एक ते दोन किमीच्या अंतरावर घडली.

  • Published by:  News18 Desk

पुणे 09 जुलै : जम्मू-काश्मीरमधील अमरनाथ गुहेजवळ झालेल्या ढगफुटीत (Amarnath cloudburst) आतापर्यंत 16 जणांचा (16 Died in Amarnath Cloudburst) मृत्यू झाला आहे. तर यानंतर आता महाराष्ट्राशी संबंधित आणिखी एक माहिती समोर आली आहेत.

काय आहे माहिती -

पुण्याच्या धायरी येथील तीन जण अमरनाथ यात्रेला गेले होते. मात्र, ढगफुटीत ते तिघे जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. धायरीतील महेश भोसले, सुनीता भोसले बेपत्ता हे बेपत्ता झाले आहेत. तर तिसरी सदस्य त्यांची आत्या आहे. त्यांचे नाव अद्याप समजलेले नाही आहे. जिल्हा प्रशासनाकडून त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गेल्या 15 दिवसांपूर्वी भोसले कुटूंब अमरनाथ यात्रेला गेले होते. मात्र, काल झालेल्या ढगफुटीत ते बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा - पुणे : अंगणात काम करताना विवाहितेसोबत घडला धक्कादायक प्रकार, सर्पदंशाने झाला मृत्यू

आळंदीचे 50 भाविक ढगफुटीत अडकले - 

आळंदीतील अजय सोनुने महाराज आळंदी परिसरातील 50 भाविकांना घेऊन अमरनाथला गेले होते. शुक्रवारी दर्शन करून परत येत असताना अचानक ढगफुटी झाली. यात एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. उर्वरित सगळे भाविक सुखरूप असून बेस कॅम्पकडे परतत असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. इतर पर्यटक संपर्कात असल्याचं सांगितलं जात आहे.

ढगफुटीची घटना पवित्र गुहेजवळील एक ते दोन किमीच्या अंतरावर घडली. हिमालय रांगातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे भाविकांसाठी लावलेले 25 टेंट आणि दोन लंगर पाण्यात वाहून गेले. पावसामुळे या संपूर्ण भागात पाणी जमा झालं आहे. प्राथमिक सूचनेनुसार ढगफुटीनंतर पाणी वाढल्यामुळे अनेक भाविक यात अडकले आहेत. भाविकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी बचाव दल पोहोचले आहेत. या घटनेचे थरकाप उडवणारे व्हिडीओदेखील समोर आले आहे.

First published:

Tags: Jammu kashmir, Pune