मराठी बातम्या /बातम्या /देश /दक्षिणेकडील राज्यांमध्ये भाजपची जादू का चालत नाही? जे.पी नड्डांनी सांगितली स्थिती

दक्षिणेकडील राज्यांमध्ये भाजपची जादू का चालत नाही? जे.पी नड्डांनी सांगितली स्थिती

जे.पी नड्डा (BJP National President J P Nadda) म्हणाले, की आता आम्ही दक्षिणेतही पुढे जात आहोत. लवकरच भाजप दक्षिणेतही आपला विजयरथ चालवेल, असा दावा त्यांनी केला आहे.

जे.पी नड्डा (BJP National President J P Nadda) म्हणाले, की आता आम्ही दक्षिणेतही पुढे जात आहोत. लवकरच भाजप दक्षिणेतही आपला विजयरथ चालवेल, असा दावा त्यांनी केला आहे.

जे.पी नड्डा (BJP National President J P Nadda) म्हणाले, की आता आम्ही दक्षिणेतही पुढे जात आहोत. लवकरच भाजप दक्षिणेतही आपला विजयरथ चालवेल, असा दावा त्यांनी केला आहे.

मुंबई 13 मार्च : देशाच्या इतर राज्यांच्या तुलनेत भाजपची (BJP in South) जादू कमी असल्याचं चित्र पाहायला मिळतं. याचंच कारण भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा (BJP National President J P Nadda) यांना विचारण्यात आलं. यावर उत्तर देताना नड्डा म्हणाले, की आता आम्ही दक्षिणेतही पुढे जात आहोत. यावेळी तेलंगणातील पोटनिवडणुकीचा हवाला देत ते म्हणाले, की याठिकाणी भाजपनं चांगलं प्रदर्शन केलं. याशिवाय हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीतही भाजपनं चांगली कामगिरी केल्याचं त्यांनी सांगितलं.

नड्डा यांनी कर्नाटकचा उल्लेखही यावेळी केला. ते म्हणाले, की कर्नाटकमध्येही भाजप चांगली कामगिरी करत आहे. येत्या काळात आम्ही केरळमध्येही चांगली कामगिरी करू आणि पुद्दुचेरीमध्ये आम्ही आमचं सरकार स्थापन करत आहोत. आता सगळं काही बदललं असून लवकरच भाजप दक्षिणेतही आपला विजयरथ चालवेल, असा दावा त्यांनी केला आहे.

जे. पी नड्डा इंडिया टुडे साउथ एन्क्लेव 2021 मध्ये बोलताना म्हणाले, तमिळनाडूची निवडणूक आमच्यासाठी दक्षिणेत स्वतःला सिद्ध करण्याची संधी आहे. नड्डा म्हणाले, की २०१९ पासून तमिळनाडूतील राजकारण आणि एनडीएच्या इमेजमध्ये मोठा बदल झाला आहे. पंतप्रधान मोदींच्या अनेक योजना तमिळनाडूमध्ये यशस्वीरित्या लागू करण्यात आल्या आहेत. एआयएडीएमके सरकारनं पूर्ण इमानदारीसह या योजना राज्यात चालवल्या आहेत. त्यामुळे, आता याठिकाणी मोठा बदल दिसून येईल.

नड्डा म्हणाले, की आम्ही विकासावर भर देतो. पंतप्रधानांचा मंत्र आहे, सबका साथ, सबका विकास. त्यामुळं, येणाऱ्या निवडणुकीतही आम्ही आमचा हा मुद्दा उचलून धरणार आहे. शबरीमाला प्रकरणातही केवळ भाजपनं आपलं म्हणणं बदललं नसल्याचा हवालाही त्यांनी दिला. केरळच्या निवडणुकीबद्दल बोलताना नड्डा म्हणाले, की तिथल्या स्थानिक निवडणुकांमध्ये आधीपेक्षा चांगली परिस्थिती पाहायला मिळाली. आगामी विधानसभा निवडणूकीतही आम्ही चांगलं प्रदर्शन करणार आहोत. नड्डा म्हणाले, की भाजपच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र होतात. मात्र, यावेळी आमचा पक्ष निवडणुकीत चांगलं प्रदर्शन करणार.

First published:
top videos

    Tags: BJP, India, Modi government, PM narendra modi, Tamil nadu