लखनऊ, 17 मार्च : पब्जी गेमवर (PUBG) किती तरी लोकांचं प्रेम आहे. याचं काही काही लोकांना इतकं वेड लागलं आहे की ते खाणंपिणंही विसरले आहेत, त्यांची तहान-भूक हरपली आहे. पण याच पब्जीमुळे प्रेम जुळल्याचीही काही प्रकरणं समोर येत आहेत. आता अशाच एका पब्जी लव्हर कपलचं प्रेम प्रकरण चर्चेत आलं आहे. जे शॉकिंग आहे. कारण पब्जीमुळे एक विवाहित महिला आणि तरुण एकमेकांच्या प्रेमात पडले. पब्जीसह पब्जी प्लेअरच्या प्रेमात बुडालेल्या विवाहितेने धक्कादायक पाऊल उचललं (Married woman fall in love with pubg player). उत्तर प्रदेशमधील हे धक्कादायक प्रकरण आहे. महाराजगंजमध्ये राहणारी ही महिला, जिला पब्जी खेळण्याची हौस होती. कित्येक तास ती मोबाईलवर पब्जी खेळायची. याचवेळी बिहारमधील एका पब्जी प्लेअर तरुणाच्या प्रेमात ती पडली. त्यानंतर अचानक एक दिवस ती गायब झाली. पत्नी मिळेना म्हणून तिच्या पतीने पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. श्यामदेउरवा पोलीस ठाण्यात ही तक्रार नोंदवण्यात आली. हे वाचा - लवकरच असं काम करणार नवरा की खूश झाली बायको; गिफ्ट केली 5 कोटींची लक्झरी कार पतीने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी महिलेचा तपास सुरू केला. ही महिला सापडली ती थेट बिहारमध्ये. तिच्या गायब होण्याचं कारण समजलं तेव्हा पतीला धक्काच बसला. सतत मोबाईलवर पब्जी खेळणारी ही महिला पब्जी प्लेअरच्या प्रेमात पडली. एक दिवस ती त्याला भेटायलाही गेली. ज्या पब्जी प्लेअरच्या प्रेमात पडली ती यूपीपासून तब्बल 350 किमी दूर बिहारमध्ये राहत होता. इतक्या लांब ती एक दिवस ती आपल्या या पब्जी प्लेअर बॉयफ्रेंडला भेटायला गेली. नवऱ्याला सोडून त्याला काहीच न सांगता ती घरातून बाहेर पडली होती. हे वाचा - अजबच आहे! स्वप्नात दुसऱ्या महिलेसोबत दिसला BF; दुसऱ्याच दिवशी GF ने केलं ब्रेकअप दैनिक भास्कर च्या रिपोर्टनुसार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पतीने आपली पत्नी बेपत्ता झाल्याची 4 मार्चला तक्रार नोंदवली होती. तिला पब्जी खेळायची सवय होती. त्याचवेळी ती बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये राहणाऱ्या एका पब्जी प्लेअरशी बोलायची. दोघं बोलता बोलात प्रेमात पडले आणि महिला घरातून फरार होत त्या तरुणाला भेटायला गेली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.