मुंबई, 17 मार्च : ब्रेकअपच्या बऱ्याच स्टोरी तुम्हाला माहिती असेल. पण सध्या सोशल मीडियावर अशी ब्रेकअप स्टोरी चर्चेत आली आहे, ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. एका तरुणीला तिचा बॉयफ्रेंड चीटिंग करत असल्याचं सतत वाटत होतं. त्यावरून तिला एकेरात्री स्वप्नंही पडलं. त्यानंतर मात्र तिने त्याच्यासोबत थेट ब्रेकअपच केला. तुम्हाला हा तरुणीचा हा निर्णय विचित्र वाटेल पण संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे ते समजून घ्या. जॅमी असं या तरुणीचं नाव आहे. ती आपल्या बॉयफ्रेंडसोबत बऱ्याच कालावधीपासून रिलेशनशिपमध्ये होती. दोघंही वेगळे राहायचं. काही दिवसांपासून जॅमीला थोडं विचित्र वाटतं होतं. प्रियकर सोबत असूनही तो तिच्यापासून दूर आहे, असं तिला जाणवत होतं. आपला बॉयफ्रेंड आपल्याला फसवतो आहे, आपल्यासोबत चीटिंग करतो आहे, त्याचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध आहेत अशी गट फिलिंग (Gut Feeling) होती. गट फिलिंग म्हणजे आतून येणाऱ्या भावना. अनेकदा आपल्याला असं वाटतं काहीतरी वाईट, विचित्र, चुकीचं घडणार आहे. भविष्यातील धोक्याचा, येणाऱ्या संकटाची जाणीव होते किंवा संकेत मिळतात. बहुतेक लोक याला गांभीर्याने घेत नाहीत त्याकडे दुर्लक्ष करतात. पण जॅमीने तसं केलं नाही. हे वाचा - एकमेकांना रंग लावताच तरुण-तरुणी लग्नबंधनात अडकतात; इथं आहे होळीची विचित्र परंपरा एकेरात्री अशाच फिलिंग्समुळे तिला मध्यरात्री अचानक जाग आली. आणि पहाटे 4 वाजताच ती आपल्या बॉयफ्रेंडच्या घरी गेली. असं अचानक बॉयफ्रेंडच्या घरी जाणं हे थोडं विचित्र होतं. पण जॅमी आपल्या गट फिलिंग्सवर विश्वास ठेवून बॉयफ्रेंडच्या घरी पोहोचली. तिच्याकडे त्याच्या घराच्या चाव्या होत्या. त्यामुळे तिने डोअरबेल न वाजवता किंवा दरवाजा न ठोकवता स्वतःच दरवाजा उघडून घरात घुसली. तेव्हा तिथं तिला जे दिसलं ते पाहून धक्काच बसला. तिचा बॉयफ्रेंड दुसऱ्या महिलेसोबत एकाच बेडवर झोपला होता. जॅमीने त्याचा फोटो काढला आणि तिथून गुपचूप निघून गेली. त्यानंतर तिने तो फोटो त्याला पाठवला आणि ब्रेकअप केलं. हे वाचा - …तर कुणीही सहजपणे तुमच्या प्रेमात पडेल; तज्ज्ञांनी सांगितली सोपी जादुई ट्रिक द सन च्या रिपोर्टनुसार जॅमीला बऱ्याच दिवसापासून आपला बॉयफ्रेंड आपल्याला फसवत आहे असं वाटत होतं. पण तिच्याकडे पुरावा नसल्याने ती काहीच करू शकत नव्हती. याच गट फिलिंग्समुळे तिने आपल्या चीटर बॉयफ्रेंडला रंगेहाथ पकडलं (Cheater Cught With Gut Feelings). त्यामुळे तुम्हालाही काहीतरी विचित्र आहे किंवा गडबड आहे असं वाटत असेल तर त्या फिलिंग्सकडे दुर्लक्ष करू नका, असा सल्ला तिने इतरांना दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.